यह ब्लॉग खोजें

मंगलवार, 18 अगस्त 2020

वाक्प्रचार Std 9 unit 3

1 स्वागत करणे - आदर सत्कार करणे

2 दंग होणे - गुंगून जाणे, मग्न होणे

3 मनात झुरणे - मनात खंत करणे

4 नाकेबंदी करणे - कडक बंदोबस्त करणे

5 नजरेस पडणे - लक्षात येणे

6 खटाटोप करणे - खूप प्रयत्न करणे

7 बाजार पालथा घालणे - सर्वत्र धुंडाळणे to search in every nook and corner

8 हाडे खिळखिळी होणे - जीर्ण होणे/ जराजर्जर होणे to be extensively harmed or damaged

9 उसने मागणे - उधार मागणे

10 उपास काढणे - खायला न मिलणे

11 डोळे पांढरे होणे - खूप घाबरणे

12 घुस्सा होणे - राग येणे

13 स्वाधीन करणे - देणे / सोपवणे to hand over

14 विधिनिषेध बाळगणे - भेदाभेद करणे to follow certain rules and prohibitions

15 टोला देणे - जशास तसे सुनावणे

16 संधी मिळणे - मोका मिळणे

17 तिळपापड होणे - खूप राग येणे to be furious

18 मानगुटीस बसणे - कब्जा घेणे/ घट्ट पकडणे  to grab someone by neck

19 बेत ठरणे - पक्का विचार करणे to make a plan

20 स्थापना करणे - एका जागी ठेवणे

21 अनुमान करणे - योग्य तर्क करणे / अंदाज घेणे

22 माल लांबवणे -  वस्तू चोरणे / वस्तू लंपास करणे

23 टोमणा देणे - उपरोधिक बोलणे to taunt

24 बचाव करणे - सुरक्षित करणे to keep safe, to safeguard someone

25 तोंडाला कुलूप लावणे - काही न बोलता स्वस्थ बसणे, मौन धारण करणे 

26 नजर टाकणे - निरीक्षण करणे to take a glance at

27 स्तिमित करणे - आश्चर्यचकित करणे - to astonish

28 - गायब होणे - नाहीसे होणे to disappear

29 - मार्ग काढणे - शोध घेणे to find a way out

30 - अपेक्षा असणे - इच्छा असणे

31 - न उकलणे - न कळणे/ न समजणे

32 - नोंद असणे -  टिपण असणे / माहिती ठेवणे to keep information about something or someone

33 - प्रयाण करणे - निघून जाणे to start a journey

34 - रक्तात भिनणे - रक्तात विरघळणे deep rooting of a thought or feeling

35 - पुकार करणे - घोष करणे to proclaim / to call out







कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

केदारनाथ : एक अनुभव

  मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना  वाटेवर एक घोडा मेलेल...