प्रश्न १ वाक्यांचा प्रकार ओळखा -
१ - तुला कोणते पुस्तक हवे ?
२ - भारतीय संघ विजयी झाला नाही.
३ - रात्री दरीत उजेड नव्हता.
४- नवविचारांचा समाज निर्माण करा.
५- भेदाभेद मिटवून टाका .
प्रश्न २ - वाक्यांचे प्रकार बदला -
- ही इमारत खूप उंच आहे ( उद्गारार्थी करा)
- तुम्ही मेहनत करा आणि यश मिळवा (विधानार्थी)
- व्यायामामुळे स्नायू सशक्त होतात. ( नकारार्थी)
- स्वावलंबी होणे नेहमी चांगलेच असते. ( प्रश्नार्थी)
- सर, मला आज कार्यक्रम द्यावे. ( आज्ञार्थी)
प्रश्न ३ शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा -
एकही अक्षर न शिकलेला
अचानक कार्य जुळून येणे
पैसे व दागदागिने ठेवण्याचे कपाट
शंभर वर्षांचा कालखंड
कार्य करण्यास योग्य समय
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें