यह ब्लॉग खोजें

मंगलवार, 30 जून 2020

तिरंगी झेंड्याचे आत्मकथन

मुलांनो, मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. मी तुमच्या मातृभूमीचे प्रतीक आहे. आज मी तुम्हाला माझी कहाणी सांगणार आहे. 1857 पासूनच भारतीय जनता इंग्रजांच्या गुलामगिरी पासून मुक्त होण्यासाठी तळमळत होती. मी स्वातंत्र्यलढ्यात नेहमी त्यांच्यासोबत राहिलो.
काळाच्या ओघात माझे रूप बदलत गेले. माझ्यावर कधी सूर्य, चंद्र तर कधी कमळ, कधी चरखा अशी चित्रे रेखाटली गेली. 1920 नंतर मी तिरंगा बनलो. माझ्यासाठी केशरी, पांढरा व हिरवा हे तीन रंग निश्चित केले गेले.
1947 मध्ये शहीदांच्या बलिदानाला यश आले.भारताचे स्वातंत्र्य समोर दिसू लागले होते. 23 जून 1947 ला माझे स्वरूप ठरविण्यात आले. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉ राजेंद्रप्रसाद. 18 जुलै 1947 रोजी माझ्याबाबतीत अंतिम निर्णय घेण्यात आला. 22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला पहिल्यांदा सर्वांसमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी पंडित नेहरू यांनी केलेले भाषण अतिशय मार्मिक असे होते. 

स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपली आहूती देणार्‍यांमुळेच माझा जन्म झाला. माझ्याबाबतीत तयार केलेले नियम तुम्हाला माहीत असले पाहिजेत. ते आता सांगतो.

भारताचा राष्ट्रध्वज समतल तिरंगा असेल. त्याचा आकार आयाताकार असून त्याची लांबी व रूंदीचे प्रमाण 2:3 असे राहील. तीन रंगांच्या पट्ट्या सरळ असतील. सर्वांत वर केशरी, मध्ये पाढंरा आणि खाली हिरव्या रंगाची पट्टी असेल. पांढर्‍या रंगाच्या पट्टीवर मध्ये निळ्या रंगाचे चोवीस आर्‍या असणारे अशोकचक्र असेल.

मला करण्यासाठीचे वस्त्र खादीचे असेल. सूती, रेशमी खादीचे वस्त्रही चालेल. पण हे सूत हाताने कातले पाहिजे. चरख्याचा वापर येथे अपेक्षित आहे. शिवण्यासाठी केवळ खादीच्या धाग्यांचा उपयोग होईल. 

माझ्यातील रंगांचे आशय आता सांगतो. केशरी रंग साहस आणि बलिदानाचे, पांढरा सत्य आणि शांतीचे आणि हिरवा रंग देशाच्या समृद्धी व हिरव्यागार भूमीचे प्रतीक आहे. चोवीस आर्‍याचे निळ्या रंगाचे चक्र २४ तास सतत प्रगतीचे प्रतीक आहे.

वर्तमान काळात मला हे पाहून दुःख होते की 15 आगस्ट, 26 जानेवारीच्या दिवशी तुम्ही कागदाचे आणि प्लास्टिक चे तिरंगे विकत घेतात. हेच राष्ट्रध्वज दुसऱ्या दिवशी कचरा पेटीत किंवा रस्त्यावर फाटलेल्या अवस्थेत दिसून येतात. जे की खूप चुकीचे आहे. माझी हीच अपेक्षा आहे की तुम्ही माझा सन्मान ठेवावा कारण माझा अपमान म्हणजे भारत देशाचा अपमान आहे.

1 टिप्पणी:

केदारनाथ : एक अनुभव

  मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना  वाटेवर एक घोडा मेलेल...