यह ब्लॉग खोजें

शनिवार, 6 जून 2020

प्रत्येकात चांगले पाहावे ( गोष्ट )




Saturday, June 6, 2020


प्रत्येकात चांगले पाहावे

आनंद नावाचा एक शेतकरी होता. तो खूप कष्ट करीत असे. त्याचे काम म्हणजे एका गावाहून दुस-या गावाला पायी जाणं,  तिथून बी-बियाणे आणून विकणे आणि त्यातीलच बियाणे आपल्याही शेतात पेरणं. ते बी-बियाणे आणायला जाताना तो कायम दोन पोती घेऊन जात असे. त्यातील एका पोत्याला छिद्र होतं. पण तरीही तो दोन्ही पोती भरून धान्य घेई आणि गावी येत असे. 

घरी पोहोचेपर्यंत छिद्र असलेलं पोतं बरंचंसं रिकामं होत असे. ते पाहून शेतक-याचा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, "तुम्ही हे फाटकं पोतं कां नेता? त्यामुळे आपलं नुकसान होत आहे."
 त्यावर शेतकरी म्हणाला, "अरे मुला, असं नाही. असं केल्याने माझं नुकसान होण्याऐवजी खूप फायदाच झाला आहे. या छिद्रवाल्या पोत्यात मी शेतातल्या धान्याचं बियाणं भरतच नाही. त्यात मी त‍ऱ्हेतऱ्हेच्या झाडांचं बियाणं भरतो. ज्या रस्त्याच्या कडेने मी जातो त्या रस्त्याच्या कडेला पोत्यातले बियाणे सांडत जातं तिथे पाऊस पडल्याने ‌ते बियाणं जमिनीत रुजतं. ‌त्याची झाडं येतात. 
आता त्या रस्त्याच्या कडेला अनेक लहानमोठी झाडं तयार झाली आहेत. त्यांना छान सुगंधी फुलं, निरनिराळी फळं लागली आहेत. काही झाडं विशाल झाली आहेत. त्यामुळे येता-जाताना त्या झाडांची सावली मिळते. फुलांचा सुगंध आणि खायला फळे मिळतात. यामुळे थकवा येत नाही आणि माझा प्रवास सुखकर होतो. 
माझ्या प्रमाणेच ल्या इतर वाटसरुंनाही त्याचा फायदा होतो. त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहून मलाही समाधान मिळतं. बाळा त्या छिद्रवाल्या पोत्याने मला इतका आनंद दिलाय. मग ते पोतं मी का टाकून देऊ?"

तात्पर्य : कुठल्याही वस्तुचा काहीना काही उपयोग होतोच.तसेच प्रत्येकाच्या अंगात काही ना काही चांगले गुण असतात. आपण तेच पाहायचे असतात. त्याचा आपल्याला फायदाच होतो

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

केदारनाथ : एक अनुभव

  मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना  वाटेवर एक घोडा मेलेल...