यह ब्लॉग खोजें

शुक्रवार, 4 सितंबर 2020

Std 10 unit 2 वाक्प्रचार

 1 - गहाण ठेवणे  - तारण ठेवणे

मुलीच्या लग्नासाठी शेतकऱ्याने आपली जमीन गहाण ठेवली.

2 - मोर्चा वळवणे - विशिष्ट काम करण्यासाठी जाणे

सैनिकांनी शत्रूशी लढण्यासाठी आपला मोर्चा वळवला.

3 - वरमणे - भावना आवरणे / लाज वाटणे

सुरेखाला शिक्षिकांनी सर्वांसमोर ओरडले म्हणून ती वरमली.

4 - स्वतःशी पुटपुटणे - तोंडातल्या तोंडात बोलणे

घराची दशा पाहून आई रागाने स्वतःशीच काहीतरी पुटपुटत होती.

शुद्धीवर आल्यावर रीमा काहीतरी स्वतःशीच पुटपुटत होती.

5 - मळमळ व्यक्त करणे - नाराजी व्यक्त करणे

पगार कमी दिल्याबद्दल कामगारांनी आपली मळमळ व्यक्त केली

6 - चेहरा पडणे - शरम वाटणे / लाज वाटणे

कामवाल्या चारुमावशींना आई ओरडली म्हणून त्यांचा चेहरा पडला.

परीक्षेत नापास झाल्यामुळे कमलचा चेहरा पडला.

7 - गडबडून जाणे - धांदल उडणे

अचानक परीक्षेची घोषणा झाल्यामुळे मुले गडबडून गेली.

8 - आ वासून पाहणे - आश्चर्याने पाहणे

जेव्हा पहिली आगगाडी चालली तेव्हा तिथे जमलेले लोक आ वासून पाहत होते.

9 - ये जा करणे - इकडून तिकडे जाणे

अनेक लोकांना नोकरीसाठी कल्याण ते मुंबई दररोज ये-जा करावी लागते.

10 - न पटणे - मान्य नसणे

तुला रांगोळी काढता येत नाही, ही गोष्ट मला पटत नाही.

नेहमी प्रथम येणारी शोभा नापास झाली, ही गोष्ट मला पटत नाही.

11 - वाव नसणे - संधी नसणे 

आमच्या घरी मुलींना एकटी परदेशाला जाण्याची वाव नाही.

12 - हातभार लावणे - मदत करणे

मी नेहमी माझ्या आईला घरकामात हातभार लावतो.

13 - तापाने फणफणणे - खूप ताप येणे 

पावसात खूप भिजून आल्यावर राजूला सर्दी झाली व रात्री तो तापाने फणफणू लागला.

14 - भारावून जाणे - प्रभाव पडणे

जादूचे खेळ पाहून मुले भारावून गेली.

ताजमहालाचे सौंदर्य पाहून मुले भारावून गेली.

15 - कमीपणाचे वाटणे - हीन दर्जाचे वाटणे

काही लोकांना रिक्शा चालवण्याचे काम कमीपणाचे वाटते.

घराची साफसफाई करणे आजकालच्या मुलांना कमीपणाचे वाटते.

16 - भरभरून बोलणे - खूप मनातले सांगणे

फार दिवसांनी माहेरी आलेली मुलगी आईशी भरभरून बोलत होती.

17 - भास होणे - भ्रम होणे/ चाहूल लागणे

अंधारात मला असा भास झाला की खोलीत कुणीतरी लपला आहे

18 - आर्थिक परिस्थिती खालावणे - पैशांची चणचण भासणे

लॉकडाऊनमुळे लोकांची आर्थिक परिस्थिती खालावली.

19 - धीर न सोडणे - हिंमत न हारणे

वडिलांच्या मृत्यूनंतर धीर न सोडता आईने सुदीपला खूप शिकवले.

20 - न खचणे - कठीण परिस्थितीत कोलमडून न जाणे

रामला अपघातात आपला पाय गमवावा लागला पण न खचता त्याने आपले जीवन पुन्हा सुरू केले.

पूर आल्यामुळे सर्व काही नष्ट झाले तरी ही रामभाऊ खचले नाही.

21 - परिस्थिती बेताची असणे - आर्थिक स्थिती जेमतेम असणे/ कसेबसे दिवस काढणे

पूर आल्यामुळे सगळी पिके बर्बाद झाली म्हणून या वर्षी शेतकऱ्याची परिस्थिती बेताची आहे.

22 - स्वतःला झोकून देणे - कार्यात समरस होणे

परीक्षा जवळ आल्यामुळे मुलांनी अभ्यासात स्वतःला 

झोकून दिले.

23 - पाया पक्का होणे - मूळ ज्ञान भक्कम होणे

माझ्या गणिताच्या शिक्षकांमुळे गणितात माझा पाया पक्का झाला.

24 - आंतरिक ओढ वाटणे - मनापासून इच्छा उत्पन्न होणे

संत नामदेवांना विठ्ठलाच्या भेटीसाठी आंतरिक ओढ वाटत होती.

25 - डोळयांत पाणी उभे राहणे - डोळयांत अश्रू येणे

दीपाची चूक नसतानाही तिला शिक्षा मिळाली म्हणून तिच्या डोळयांत पाणी उभे राहिले.

26 - अंगावर काटा उभा राहणे - भीतीने शहारा येणे/ घाबरणे

हत्ती आणि सिंहाची लढाई पाहून माझ्या अंगावर काटा उभा राहिला.

27 - पडेल ते काम करणे - कोणतेही काम करणे

गरिबीच्या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी अंजनेशने पडेल ते काम केले.

28 - गोडी लावणे - आवड लावणे

भावे सरांनी मुलांना चित्रकलेची गोडी लावली.

28 - संस्कार करणे - चांगले विचार रुजवणे

आईवडिलांनी आपल्या मुलांवर चांगले संस्कार केले पाहिजे.

29 - भान देणे - जाणीव निर्माण करणे

महात्मा गांधींनी भारतीय लोकांना स्वातंत्र्याचा भान दिला.

30 - सामना करणे - मुकाबला करणे

कामगाराला अनेक संकटांचा सामना करावा लागतो.

31 - डोळे पाणावणे - रडू येणे, डोळयांत अश्रू येणे

गरीब लोकांचे हाल पाहून शिवाजीरावांचे डोळे पाणावले.

32 - शाश्वती नसणे - भरवसा नसणे 

सोहन डॉक्टर होईल अशी कुणालाही शाश्वती नव्हती.

 Lesson 6 चूडीवाला

33 - पर्वणी असणे - आनंदमय काळ मिळणे

दिवाळीची सुटी ही आमच्यासाठी एक पर्वणी असते.

34 - समजूत काढणे - पटवून सांगणे

राजूने नवीन मोबाइलसाठी हट्ट धरला होता पण आईने त्याची समजूत काढल्यावर त्याने हट्ट सोडला

35 - कीव येणे - दया येणे

भिकारी थंडीत कुडकुडत होता, मला त्याची कीव आली.

36 - गलका करणे - खूप आवाज करणे

सहलीला जाण्याच्या आनंदात मुले वर्गात गलका करू लागली.

37 - आतुरतेने वाट पाहणे - उत्सुकतेने वाट पाहणे

रमा आपल्या मुलाची आतुरतेने वाट पाहत होती.

38 - सत्कार होणे - सन्मान होणे

आज माझ्या मित्राचा आदर्श विद्यार्थी म्हणून सत्कार झाला.

39 - संकोच वाटणे - भीड वाटणे

गुरुजींकडून पैसे घेताना गरीब मुलाला फारच संकोच वाटत होता.

40 - भारावून जाणे - प्रभावित होणे 

महात्मा गांधींचे भाषण ऐकून सर्व लोक भारावून गेले होते.

41 - हातभार लागणे - मदत मिळणे

गरीब लोकांना सरकारने मोफत राशन दिले त्यामुळे त्यांना थोडा हातभार लागला.

42 - आश्वासन देणे - हमी देणे

यावर्षी शेतकऱ्यांचे कर्ज माफ करणार असा सरकारने आश्वासन दिला.

43 - डोळे लावून बसणे - सतत वाट पाहणे

आई नोकरीवरून कधी परत येते यासाठी राजू आणि नेहा डोळे लावून बसले होते.

44 - आयुष्याचे मोल देणे - जीवन समर्पित करणे

सैनिकांनी आपल्या देशाच्या रक्षणासाठी आयुष्याचा मोल दिला.

45 - मान खाली घालणे - नम्र होणे 

मालक नोकराला शिव्या देत होते तरीही नोकर मान खाली घालून ऐकत होता .




1 टिप्पणी:

केदारनाथ : एक अनुभव

  मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना  वाटेवर एक घोडा मेलेल...