1 मळ क्षाळणे - मळ धुणे
आईने पाणी व साबण वापरून कपड्यांचे मळ क्षाळले.
2 जन्म पावणे - जन्म घेणे
या भारतभूमीवर जन्म पावून मी धन्य झाले.
3 अधःपतन होणे - दर्जा घसरणे
वर्तमानकाळात शिक्षणाचा अधःपतन झाला आहे.
4 निघण्याच्या बेतात असणे - जाण्याच्या तयारीत असणे
जेव्हा आम्ही निघण्याच्या बेतात होतो, तेव्हाच आमची कार खराब झाली.
5 कडाक्याच्या थंडीने कुडकुडणे - अंग थरथरणे
एक गरीब बाई रस्त्याच्या कडेला कडाक्याच्या थंडीने कुडकुडत होती.
6 कर्जबाजारी होणे - कर्जात बुडून जाणे
लॉकडाऊनमुळे अनेक लोक कर्जबाजारी झाले.
7 भीकेला लागणे - दारिद्रय वाट्याला येणे
रामभाऊंना व्यापारात खूप नुकसान झाला आणि ते भीकेला लागले.
8 गमावून बसणे - असलेले हरवून जाणे
नदीत पूर आल्यामुळे गावकरी आपले सर्वकाही गमावून बसले.
9 उसंत न लाभणे - वेळ न मिळणे
परीक्षा जवळ आल्यामुळे मुलांना खेळण्यासाठी उसंत लाभत नाही.
10 चक्कर मारणे - फेरफटका मारणे
दररोज सकाळी मी बागेत चक्कर मारायला जाते.
11 हात जोडणे - नमस्कार करणे
मी गणपती बाप्पांच्या मूर्तीसमोर हात जोडले.
12 सुरुंग लावणे - एखादा बेत उधळून लावणे
मी सहलीला जाणार होते पण वडिलांनी परवानगी न देऊन माझ्या योजनेला सुरुंग लावले.
13 मूठभर मास चढणे - स्तुतीने हुरळून जाणे
गुरुजींनी श्यामची प्रशंसा केली म्हणून त्याला मूठभर मास चढले.
14 अंगाचा तिळपापड होणे - खूप संताप येणे
जेव्हा माझ्या भावाने माझा मोबाइल घेतला, तेव्हा माझ्या अंगाचा तिळपापड झाला.
15 हात दाखवून अवलक्षण - आपण होऊन संकट ओढवून घेणे
मी उपाशीपोटी राहू शकत नाही तरीही महाशिवरात्रीचा उपास करण्याचा संकल्प केला, याला म्हणतात हात दाखवून अवलक्षण.
16 कानावर येणे - बातमी/वार्ता समजणे
एक सेप्टेंबरपासून शाळा उघडणार आहेत अशी बातमी लोकांच्या कानावर आली.
17 भीक न घालणे - पर्वा न करणे
सावित्रीबाई फुले लोकांच्या बोलण्याला भीक न घालता मुलींना शिक्षण देत होत्या.
18 झोप उडणे - बेचैन होणे
नवऱ्याला कैंसर झाला आहे, ही बातमी मिळाल्यापासून सावित्रीची झोप उडाली.
19 आस्था वाढणे - प्रेम वाटू लागणे
वडिलांना दररोज व्यायाम करताना पाहून माझी ही व्यायामावर आस्था वाढू लागली.
20 पारंगत असणे - कुशल असणे
माझी आई स्वयंपाक करण्यात पारंगत आहे.
21 अवहेलना करणे - अपमान करणे
कधीही गुरुजनांची अवहेलना करू नये.
22 सक्त ताकीद देणे - कडक समज देणे
माझ्या वस्तूंना हात लावायचा नाही, अशी मी माझ्या भावाला सक्त ताकीद दिली.
23 विचार पोकळ असणे - विचार तकलादू असणे
मी पूर्ण दिवस उपास करू शकते, हा विचार पोकळ आहे.
24 सूड घेणे - बदला घेणे
समीरने संजयचा सर्वांसमोर अपमान केला होता, त्याचा संजयने सूड घेतला.
25 हादडणे - जेवणावर ताव मारणे
आईने बटाटेवडे बनवले होते त्यांपैकी रामूने सहा वटाटेवडे हादडले.
26 वेड्यात काढणे - बावळट समजणे
मी मुलांना शेत दाखवायला नेण्याचे ठरवले, तेव्हा सर्वांनी मला वेड्यात काढले.
27 हकालपट्टी करणे - हाकलून देणे
बैल म्हातारा झाल्यावर शेतकऱ्याने आपल्या घरातून त्याची हकालपट्टी केली.
28 खुलासा होणे - सविस्तर कळणे
काही मुलांनी वर्गात दंगामस्ती करण्याचा बेत केला होता, याचा गुरुजींना खुलासा झाला.
29 कमवून खाणे - स्वकष्टार्जित खाणे/ कष्टाने काम करून खाणे
आम्ही स्वतः कमवून खातो, कुणी आम्हाला जेवू घालत नाही.
30 समाचार घेणे - विचारपूस करणे
मी आजारी पडल्यावर माझ्या मैत्रिणी माझा समाचार घेण्यासाठी घरी आल्या.
31 राखीव कुरण असणे - एखाद्या विषयात गती असणे ( to excel in something )
गणित विषयाचे कठीण प्रश्न सोडवणे माझ्या मैत्रिणीचे राखीव कुरण आहे/ रांगोळी काढणे हे सीमाचे राखीव कुरण आहे, असे तिला वाटते.
33 बळी पडणे - मान्य करणे/ अधीन होणे/ वशीभूत होणे( to be a victim of something)
आजकालची तरुण पिढी अनेक व्यसनांना बळी पडू लागली आहे.
34 - धडगत नसणे - सुटका नसणे
जर तू माझा मोबाइल घेतला, तर तुझी धडगत नाही
35 - क्षमा करणे - माफ करणे
लहानांच्या चुकांना क्षमा करणे हे मोठ्यांचे स्वभाव असते.
36 - जिभेवर ताबा नसणे - खाण्यावर/ बोलण्यावर नियंत्रण नसणे
आईने गुलाबजाम बनवल्यावर कुणाचाही जिभेवर ताबा राहू शकत नाही/
दीपा कुणालाही टोचून बोलते कारण तिचा जिभेवर ताबा नाही.
37 - कटाक्ष टाकणे - नजर तिरपी करून बघणे ( to glance)
परीक्षेत मी शिक्षकांची नजर चुकवून आपल्या मैत्रिणीकडे कटाक्ष टाकला.
38 - पश्चाताप होणे - केलेल्या चुकीची जाणीव होणे
रामूने आपल्या मित्राचा विश्वासघात केला याचा त्याला पश्चाताप झाला.
39 - भरल्या ताटावरून उठणे - न जेवता उठणे
आई रागावली म्हणून मोहन भरल्या ताटावरून उठला.
40 - इच्छा दाबून धरणे - इच्छा अडवून ठेवणे
मला नवीन मोबाइल घ्यायचा होता पण पैसे नसल्यामुळे मी ती इच्छा दाबून धरली.
41 - आदर दुणावणे - आदर दुप्पट होणे
सीमा गरीब मुलांना मोफत शिकवते, हे जाणून माझ्या मनात तिच्याविषयी आदर दुणावला.
42 - कबुली देणे - मान्य करणे
रामने श्यामला एक लाख रुपए देण्याची कबुली दिली.
It was so helpfull to us. Keep it up.
जवाब देंहटाएंThxx mam
जवाब देंहटाएंThankyou Mam
जवाब देंहटाएंIts very helpful
जवाब देंहटाएंIt is very helpful thanks🙂
जवाब देंहटाएं