यह ब्लॉग खोजें

रविवार, 9 जुलाई 2023

केदारनाथ : एक अनुभव

  मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना  वाटेवर एक घोडा मेलेला आहे असे मला दिसले. जवळ आल्यावर कळले की मेलेला नाही. त्याचे श्वास चालू होते.  सगळेजण आजूबाजूने जात होते. त्या मुक्या प्राण्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे होता लोकांकडे ! तिथे एक एक घोडेवाला तीन चार घोडे एकाच वेळी सांभाळतो. घोड्यावर बसायला भीती वाटते. अक्षरशः स्पर्धा करतात एकमेकांशी. 

असो. मला तो घोडा दिसला. मी जरा जवळ गेले. त्याचे श्वास चालू होते. मान टाकलेली होती पण पोट वर खाली होत होते. मी ही इतरांप्रमाणे पुढे गेले. का कोण जाणे पण मला अशी प्रेरणा झाली की तुझ्याकडे गंगोत्रीवरून आणलेले गंगाजल आहे. ते त्याच्या तोंडात टाक. माणसाच्या शेवटच्या क्षणी आपण गंगाजल देतो ना त्याच्या तोंडात ? मग या बिचाऱ्या प्राण्याला का देऊ नये? मी परत त्या घोड्याजवळ आले. गंगोत्रीवरून आणलेली गंगाजलाची मोठी बाटली काढली.  सकाळी केदारनाथावर अभिषेक करताना थोडे गंगाजल वापरले होते. गंगोत्रीवरून आणलेले गंगाजल आणि शुद्ध तूप यांनीच केदारनाथाचे अभिषेक केले जाते.

मी ती अर्धी बाटली गंगाजल त्या घोड्याच्या तोंडात टाकले. फक्त थोडे घरी घेऊन जाण्यासाठी ठेवले.भीतीही वाटत होती की हा एकदम उठला तर ? पण तो उठला नाही. पाणी त्याच्या तोंडात गेले  की नाही,माहीत नाही. पण त्याच्या तोंडातून एकदम रक्ताची धार वाहू लागली. मी घाबरून मागे हटले आणि वाट चालायला लागले. दहा वीस कदम पुढे जाऊन मागे पाहते तर त्याने मान वर केली होती व मला केविलवाण्या नजरेने बघत होता. थोडे पुढे जाऊन बघितले तर अजूनही तो माझ्या दिशेने बघत होता. मला दया येत होती त्याची, पण मी काही करू शकत नव्हते.  माझा ग्रुप पुढे गेला होता. मी भराभर चालायला लागले. पाय लटपटत होते. 

खाली रामबाड़ाला (केदारनाथ ते गौरीकुंड मार्गावर पूर्वी असलेले एक ठिकाण ) येईपर्यंत माझ्या पायांनी जवाब दिला आणि मजबूर होऊन शेवटचा सात किलोमीटरचा मार्ग उतरताना मला घोडा करावाच लागला. 

मीना शर्मा 

(30/05/2012)



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

केदारनाथ : एक अनुभव

  मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना  वाटेवर एक घोडा मेलेल...