यह ब्लॉग खोजें

मंगलवार, 30 जून 2020

सैनिकाचे आत्मकथन

या मुलांनो या ! मला वाटलेच होते की मी गावात आलो की तुम्ही मला भेटायला येणार ! काय म्हणालात ? कसं वाटते मला सैन्यात गेल्याबद्दल? अरे बाबांनो, सैन्यात जाणे माझे ध्येयच होते. थांबा, मी तुम्हांला माझी कहाणीच सांगतो.

माझे वडील भारतीय सैन्यात होते. मी तीन वर्षांचा असतानाच माझ्या बाबांना शत्रूबरोबर लढताना मरण आले. आजोबांनी व आईने मला मोठे केले. सैन्यात दाखल व्हायचे असे मी ठरवले. पाचव्या इयत्तेपासूनच मी सातारच्या सैनिकी शाळेत दाखल झालो. मी वसतिगृहात राहायचो. मग मी सैनिकी महाविदयालयात नाव घातले. तेथे पदवी मिळवतानाच मला सैन्यात नोकरी मिळाली. पहिले दीड वर्ष वेगवेगळे तांत्रिक शिक्षण घेण्यात गेले. ते पूर्ण झाल्यावर 'मेजर' म्हणून भारताच्या उत्तर सीमेवर माझी नेमणूक झाली.

आमचे काम खूप अवघड आहे. आम्ही जेथे असतो तो भाग अतिशय थंड आहे. कारगिलसारखा अतिथंड प्रदेश असो अथवा उन्हाचे चटके देणारे वाळवंट असो, आम्ही डोळयांत तेल घालून सीमेची राखण करतो. जमीनीवरच नव्हे तर समुद्रातही आमचे बांधव जहाजांवरून शत्रूवर नजर ठेवतात. शत्रूकडून मारा सुरू झाला, तरी आम्ही आपले ठाणे सोडत नाही. शत्रूच्या हल्ल्यात आपले सहकारी मृत्यू पावले, तर फार दुःख होते. 

सैनिकाचे जगणे मोठे अवघड असते, त्याला राष्ट्रासाठी लढावे लागते, हेच त्याचे कर्तव्य आहे. मनात बायको पोरांचा कितीही विचार असला, घराची कितीही आठवण येत असली तरी शत्रूपासून देशाची रक्षा करणे हेच त्याचे  ध्येय असते. आम्ही फक्त बंदूक घेऊन शत्रूशी लढण्याचे काम करतो, असे नाही. कुठे पूर आला, भूकंप आला तरी आम्ही लोकांचे जीव वाचवण्यासाठी धावतो. दुर्गम पर्वतीय भागात आम्ही रस्ते बांधतो. तीर्थयात्रेला जाणाऱ्यांचे संरक्षण करतो. दंगलीच्या वेळी, निवडणुकींच्या वेळी शांतीचे वातावरण निर्माण करण्यासाठीही सैन्याची मदत घेतली जाते.

माझ्या सैनिकी जीवनात मला अजून प्रत्यक्ष लढण्याची संधी मिळाली नाही. हल्ली तर अतिरेकी हल्ल्यांचे संकट सतत घोंघावत असते पण माझ्या देशाच्या रक्षणासाठी मी सदैव तयार असतो. ते मी माझे परमभाग्य समजतो."

तिरंगी झेंड्याचे आत्मकथन

मुलांनो, मी तुमचा राष्ट्रध्वज बोलतोय. मी तुमच्या मातृभूमीचे प्रतीक आहे. आज मी तुम्हाला माझी कहाणी सांगणार आहे. 1857 पासूनच भारतीय जनता इंग्रजांच्या गुलामगिरी पासून मुक्त होण्यासाठी तळमळत होती. मी स्वातंत्र्यलढ्यात नेहमी त्यांच्यासोबत राहिलो.
काळाच्या ओघात माझे रूप बदलत गेले. माझ्यावर कधी सूर्य, चंद्र तर कधी कमळ, कधी चरखा अशी चित्रे रेखाटली गेली. 1920 नंतर मी तिरंगा बनलो. माझ्यासाठी केशरी, पांढरा व हिरवा हे तीन रंग निश्चित केले गेले.
1947 मध्ये शहीदांच्या बलिदानाला यश आले.भारताचे स्वातंत्र्य समोर दिसू लागले होते. 23 जून 1947 ला माझे स्वरूप ठरविण्यात आले. यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली होती. त्या समितीचे अध्यक्ष होते डॉ राजेंद्रप्रसाद. 18 जुलै 1947 रोजी माझ्याबाबतीत अंतिम निर्णय घेण्यात आला. 22 जुलै 1947 रोजी घटना समितीच्या सभेत पंडित जवाहरलाल नेहरू यांनी मला पहिल्यांदा सर्वांसमोर फडकावले. हा माझा जन्मदिवस म्हणता येईल. मला भारताचा राष्ट्रध्वज म्हणून स्वीकारण्यात आले. यावेळी पंडित नेहरू यांनी केलेले भाषण अतिशय मार्मिक असे होते. 

स्वातंत्र्यासाठी योगदान देणार्‍या हुतात्म्यांच्या रक्ताचा रंग माझ्यात वसलेला आहे. स्वातंत्र्य संग्रामात आपली आहूती देणार्‍यांमुळेच माझा जन्म झाला. माझ्याबाबतीत तयार केलेले नियम तुम्हाला माहीत असले पाहिजेत. ते आता सांगतो.

भारताचा राष्ट्रध्वज समतल तिरंगा असेल. त्याचा आकार आयाताकार असून त्याची लांबी व रूंदीचे प्रमाण 2:3 असे राहील. तीन रंगांच्या पट्ट्या सरळ असतील. सर्वांत वर केशरी, मध्ये पाढंरा आणि खाली हिरव्या रंगाची पट्टी असेल. पांढर्‍या रंगाच्या पट्टीवर मध्ये निळ्या रंगाचे चोवीस आर्‍या असणारे अशोकचक्र असेल.

मला करण्यासाठीचे वस्त्र खादीचे असेल. सूती, रेशमी खादीचे वस्त्रही चालेल. पण हे सूत हाताने कातले पाहिजे. चरख्याचा वापर येथे अपेक्षित आहे. शिवण्यासाठी केवळ खादीच्या धाग्यांचा उपयोग होईल. 

माझ्यातील रंगांचे आशय आता सांगतो. केशरी रंग साहस आणि बलिदानाचे, पांढरा सत्य आणि शांतीचे आणि हिरवा रंग देशाच्या समृद्धी व हिरव्यागार भूमीचे प्रतीक आहे. चोवीस आर्‍याचे निळ्या रंगाचे चक्र २४ तास सतत प्रगतीचे प्रतीक आहे.

वर्तमान काळात मला हे पाहून दुःख होते की 15 आगस्ट, 26 जानेवारीच्या दिवशी तुम्ही कागदाचे आणि प्लास्टिक चे तिरंगे विकत घेतात. हेच राष्ट्रध्वज दुसऱ्या दिवशी कचरा पेटीत किंवा रस्त्यावर फाटलेल्या अवस्थेत दिसून येतात. जे की खूप चुकीचे आहे. माझी हीच अपेक्षा आहे की तुम्ही माझा सन्मान ठेवावा कारण माझा अपमान म्हणजे भारत देशाचा अपमान आहे.

शनिवार, 6 जून 2020

प्रत्येकात चांगले पाहावे ( गोष्ट )




Saturday, June 6, 2020


प्रत्येकात चांगले पाहावे

आनंद नावाचा एक शेतकरी होता. तो खूप कष्ट करीत असे. त्याचे काम म्हणजे एका गावाहून दुस-या गावाला पायी जाणं,  तिथून बी-बियाणे आणून विकणे आणि त्यातीलच बियाणे आपल्याही शेतात पेरणं. ते बी-बियाणे आणायला जाताना तो कायम दोन पोती घेऊन जात असे. त्यातील एका पोत्याला छिद्र होतं. पण तरीही तो दोन्ही पोती भरून धान्य घेई आणि गावी येत असे. 

घरी पोहोचेपर्यंत छिद्र असलेलं पोतं बरंचंसं रिकामं होत असे. ते पाहून शेतक-याचा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, "तुम्ही हे फाटकं पोतं कां नेता? त्यामुळे आपलं नुकसान होत आहे."
 त्यावर शेतकरी म्हणाला, "अरे मुला, असं नाही. असं केल्याने माझं नुकसान होण्याऐवजी खूप फायदाच झाला आहे. या छिद्रवाल्या पोत्यात मी शेतातल्या धान्याचं बियाणं भरतच नाही. त्यात मी त‍ऱ्हेतऱ्हेच्या झाडांचं बियाणं भरतो. ज्या रस्त्याच्या कडेने मी जातो त्या रस्त्याच्या कडेला पोत्यातले बियाणे सांडत जातं तिथे पाऊस पडल्याने ‌ते बियाणं जमिनीत रुजतं. ‌त्याची झाडं येतात. 
आता त्या रस्त्याच्या कडेला अनेक लहानमोठी झाडं तयार झाली आहेत. त्यांना छान सुगंधी फुलं, निरनिराळी फळं लागली आहेत. काही झाडं विशाल झाली आहेत. त्यामुळे येता-जाताना त्या झाडांची सावली मिळते. फुलांचा सुगंध आणि खायला फळे मिळतात. यामुळे थकवा येत नाही आणि माझा प्रवास सुखकर होतो. 
माझ्या प्रमाणेच ल्या इतर वाटसरुंनाही त्याचा फायदा होतो. त्यांच्या चेह-यावरचा आनंद पाहून मलाही समाधान मिळतं. बाळा त्या छिद्रवाल्या पोत्याने मला इतका आनंद दिलाय. मग ते पोतं मी का टाकून देऊ?"

तात्पर्य : कुठल्याही वस्तुचा काहीना काही उपयोग होतोच.तसेच प्रत्येकाच्या अंगात काही ना काही चांगले गुण असतात. आपण तेच पाहायचे असतात. त्याचा आपल्याला फायदाच होतो

सोमवार, 1 जून 2020

मला पंख असते तर !

                   सकाळी बाहेरगावी असलेल्या मामेभावाचा फोन आला होता. तो सांगत होता त्यांच्या गावात चालु असलेल्या जत्रे विषयी आणि म्हणत होता तु पण ये ना इकडे खुप मज्जा येईल. त्यावेळेस मी बोलुन गेलो “मला काय पंख आहेत का? कधीही उठाव आणि उडत उडत कुठेही पोहोचावं!”


त्याचा फोन ठेवला आणि मना मध्ये विचारचक्र सुरु झाले, खरंच मला पंख असते तर?



                    सगळ्यांत पहिल्यांदा म्हणजे कुठेही जाण्यासाठी जे आई-बाबांवर अवलंबुन रहावे लागते ते नाहीसे होईल. क्धीहि, कुठेही जावेसे वाटले तरी ते सहज शक्य आहे नाही का? पंख पसरले, आकाशी भरारी घेतली आणि झालो हवेच्या लाटेवर स्वार. रस्त्यावरील वाहतुकीचा, गर्दीचा त्रास नाही, वाहनाची किंवा वाहनचालवण्याच्या परवान्याची आवश्यकता नाही की अपघाताची भीती नाही.



                   रस्त्यावरील घाण, कचरा, दुर्गंधी, खड्डे हे सगळे पादचाऱ्यांसाठी, हवेत उडणाऱ्याला त्याची काय पर्वा? अवकाशातुन ही धरणी सुंदर, हिरवीगारच भासते. जमीनीवर भासणाऱ्या उत्तंग इमारती आकाशातुन किती छोट्या वाटतील? कधी या झाडावर तर कधी त्या झाडावर. ना राज्यांची बंधन ना देश्याच्या सिमा. मनात आलं तर कधी एका देशात तर कधी दुसऱ्या. कित्ती मज्जा!! शब्दशः सांगायचे झाले तर “वसुधैव कुटुंबकम”, हे विश्वची माझे घर.



                     पंखांमध्ये बळ समावुन, एक उंच भरारी घेता येईल. उंच.. अजुन उंच, त्या निळ्या आकाश्याच्या दिशेने, ढगांच्या मध्ये. धुंद होऊन त्या निळाईमध्ये तरंगत राहीन नाहीतर मावळत्या दिनकराच्या त्या तांबड्या गोळ्याने सोनेरी झालेल्या आसमंतामध्ये गिरक्या घेत राहीन.



                    वेळे अभावी, अधीक अंतरामुळे जे अनेक जिवाभावाचे मित्र, नातेवाईक यांची भेट होऊ शकत नाही अश्या सगळ्यांना भेटु शकेन. दिवसभर मोकळ्या आकाश्यात झेपावल्यानंतर संध्याकाळी आपल्या घरट्यामध्ये परतुन पंखांचेच उबदार पांघरुण करीन आणि त्यात निजुन जाईन.



बघा.. नुसत्या विचारांनाच पंख फुटले तर कुठे कुठे जाऊन आलो, मग खरंच पंख फुटले तर!!


फळ्याचे आत्मकथन

''अरेरे! काय माझी ही दुर्दशा! तुम्ही मला काळ्या रंगाने रंगवलं आहे. तुम्ही माझं तोंड काळं करून टाकलं आहे. विसरलात वाटते मला सारे जण? अरे मी तुमच्या वर्गात असलेला अविभाज्य घटक, म्हणजेच मी फळा आहे.''

तुम्ही मला आकाशात किंवा जमिनीवर नाही लावले. तुम्हीतर चक्क मला दोन खिळ्यांमध्ये त्रिशंकूसारखे अधांतरी टांगवले आहे. किती वर्षे झाली, मी इथेच आहे. कुठे जाता येत नाही, कोणाशीच बोलता येत नाही. दिवसा तुम्ही मुले शाळेत येतात व माझ्या मदतीने शिकता, तेव्हा किती आनंद होतो मला! परंतु रात्री मी या काळ्याकुट्ट खोलीत एकटाच असतो. रात्र जणू खायलाच येते मला! तेव्हा मी तुमची वाट पाहत असतो. कधी सकाळ होऊन तुम्ही शाळेत येता हे पाहण्यासाठी मोठ्या आतुरतेने तुमची वाट पाहतो. तुम्हापैकी किती जण वर्गात शिक्षक शिकवत असतात, तेव्हा मागे बडबड करीत असतात. शिक्षकाला मात्र हे सर्व पाहता येत नाही, पण मी हे सर्व पहात असतो... 

कुणी माझ्या अंगावर गणित सोडवतात, कुणी संस्कृत संधी, समास लिहितात. शरीराचं सार्थक होत आहे, असं मला वाटतं. विज्ञानाचे शिक्षक माझ्यावर सुंदर आकृत्या काढतात. किती सुरेख असतात त्या! असे वाटते की कुणी कधी ते पुसूच नये. पण तुमचे इतिहासाचे शिक्षक आले की माझ्यावर जणू तोफांचा माराच होतो. ते जोरादर खडूचे फराटे माझ्या अंगावर उडवत असतात. वर्गात शिक्षक नसले की काही खोडकर मुले माझ्या अंगावर डस्टर आपटतात, मला काहीतरी टोचून माझ्या अंगावर भोके पाडतात तेव्हा मला अक्षरक्षः रडूच कोसळते.



माझा रंग काळा दिला आहे म्हणून मला खूप वाईट वाटते. पण मी असे ऐकले आहे की माझे काही बंधू आता पांढरे आणि हिरवेदेखील आहेत त्यांना व्हाइट बोर्ड, ग्रीन बोर्ड अशी नावे दिली आहेत. हे ऐकून बरे वाटते. कधी कधी माझ्यावर गुणवंत विद्यार्थ्यांची नावे लिहिली जातात. तेव्हा वर्गात पहिल्या आलेल्याचे अभिनंदन करावेसे वाटते. पण काय करू! मला हात नाहीत ना! मी असे ऐकले आहे की, आपल्या वर्गात शिकून गेलेले काही विद्यार्थी परदेशात डॉक्टर व साइंटिस्टसुद्धा झाले आहेत. ते ऐकून खूप अभिमान वाटतो मला.


कधी कधी मला रागही येतो. का तुम्ही मला काळं बनवलं? का तुम्ही मला असं अधांतरी लटकवलं? पण मी एक निश्चय केला आहे. मराठीच्या तासाला  सरांनी तुम्हाला 'दोन मेणबत्त्या' हा पाठ शिकवला होता. तो मला खूप आवडला. त्यात ती मेणबत्ती म्हणाली होती की, ' तू जर स्वत:साठी जगलात तर मेलास, पण दुसऱ्यांसाठी जगलास तर जगलास!' हे वाक्य मला खूप आवडते. म्हणून मीही दुसऱ्यांसाठी जगण्याचं ठरवलंय. दुसऱ्यांची सेवा करण्यातच मला धन्यता वाटते

रस्त्याचे मनोगत/मी रस्ता बोलतोय


मित्रांनो, माझा जन्म कधी झाला, हे जरी मला आठवत नसले, तरी तो रामायण-महाभारत घडण्याच्या आधी नक्कीच झाला. कारण राम माझ्या अंगावरूनच वनवासात गेले तर महाभारतासाठी माझाच वापर झाला. मला आठवते- माझ्या लहानपणी माझे नाव ‘पायवाट’ असे होते. अगदी पायी जाण्यापासून तर बैलगाडी, खेचर, घोडागाडी सुद्धा बिनभोबाट माझ्या अंगावरून जायची. पण मला कधी त्रास व्हायचा नाही, अगदी खाचखळगे असून सुद्धा! 

मी अगदी किर्रऽऽ घनदाट जंगलातून सुद्धा पसरलेलो होतो, ज्यावरून हिंस्त्र श्वापदेही फिरायचे, पण मला त्यांची कधी भीती वाटली नाही. छत्रपती शिवाजी महाराज, महाराणा प्रताप, राणी लक्ष्मीबार्ई, स्वातंत्र्यवीर सावरकर तसेच अनेक रथी- महारथी, स्वातंत्र्य सैनिक देश प्रेमाखातर माझ्या अंगावरून स्वारी करून जायचे, याचा मला नितांत अभिमान वाटायचा.
माझ्या आजूबाजूला घनदाट झाडेझुडपे असल्याने पाऊस, उन्हापासून माझे संरक्षण व्हायचे. मी वयात यायला लागलो तसे माझे रूंपांतर डांबरीकरणामध्ये व्हायला लागले. जसे जसे रस्ते डांबरांनी काळेशार व्हायला लागले, तुम्हा सर्वांना माझ्यावर स्वारी करायला मजा वाटायची पण एकदा का डांबरी रस्त्यावर पाणी साचले की तिथे खड्डा पडलाच पाहिजे. दोन-तीन वर्षे गेली की परत नवीन डांबराचा रस्ता बनवणे सुरू असते. माझ्या आजूबाजूची सर्व झाडे तोडुन टाकतात म्हणून पावसाचे पाणी सरळ माझ्या उरावर पडते वर उन्हाच्या झळांनी डांबर वितळून खड्डे निर्माण होतात.
 आता मला सांगा मित्रांनो- यात माझा काय दोष ? मला तुम्ही प्रत्येक खड्यागणिक कोसत राहता. पण ज्याप्रमाणे तुम्हाला त्रास होतो, तसाच मला पण होतो. मधूनमधून केबल, इलेक्ट्रिक विभाग मला खोदायला घेतात. 
 माझ्या आजूबाजूला सुरू असलेले बांधकामाचे साहित्य माझ्या उरावर आणून टाकतात. कालांतराने हे वाळून त्याचे मोठेमोठे ढीग रस्त्यावर अतिक्रमण करतात पण या सर्वांकडे दुर्लक्ष करून सर्व मला दोष देतात.

पुढे जसे माझे तरुण वय सरत आले. माझ्यात क्रांती घडणे सुरू झाले. आता संपूर्ण देशात माझे सिमेंटीकरण होत आहे. पण हे करताना जो विलंब होतो आहे, तो अतिशय क्लेशदायक आहे. नाही म्हणायला जे रस्ते सिमेंटचे झाले आहेत, त्यावरून तुम्हाला स्वारी करताना बघून माझा उर अभिमानाने भरून येतो.
याच्या पुढची पायरी म्हणजे ‘पेव्हर ब्लॉक्स!’ हे जेव्हा माझ्या उरामध्ये फसवायला संबंधित विभागाने सुरुवात केली, तेव्हा मला हसू की रडू कळेना! कारण एकतर हे जरी गोंडस दिसत असले, तरी माझे वय कमी करू शकत नव्हते. भरीस भर एकसंघ लावण्याचा अभाव असल्याने पाणी जिरणे, लेव्हलिंग खालीवर होणे असे घडू लागले. होणारे अपघात माझ्या काळजाला चिरे पाडू लागले.
पण जसे जसे माझे वय वाढत चालले, तसा मी पण उर्मट बनत चाललो आहे. कारण मला माहिती आहे की एका हाताने टाळी वाजत नसते. म्हणून माझी विनंती आहे की- सर्व संबंधित विभाग व आपल्यासारखे सुजाण नागरिक एकत्र येऊन समन्वय राखून माझे पुनर्वसन करून जोडीला आजूबाजूला वृक्षरोपण केले, तर माझा सुवर्ण युग दूर नाही

केदारनाथ : एक अनुभव

  मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना  वाटेवर एक घोडा मेलेल...