यह ब्लॉग खोजें

शुक्रवार, 11 फ़रवरी 2022

चांगली संगत करा

 [ शाळेत जाणारा कष्टाळू व प्रामाणिक मुलगा  - वाईट मित्रांची संगत - शिक्षकांना काळजी मुलाला घेऊन बाजारात फेरफटका - उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी - एक खराब झालेला आंबा त्यांमध्ये ठेवणे - दोन दिवसांनी पाहणी - नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब - संदेश.] - 

एका गावात विजय नावाचा एक मुलगा होता. स्वतः प्रामाणिकपणे अभ्यास करून कष्टाने तो शाळेत जात असे. त्याच्या या गुणाने तो शिक्षकांमध्येही प्रिय होता.

पण त्याला वाईट मित्रांची संगत लागली. त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. शाळा बुडवणे, व्यसने करणे अशा वाईट मार्गाला तो लागला.त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर झाल्याने तो नापास झाला. शिक्षकांच्या ते लक्षात आले व त्यांना सगळे समजले.
त्याला शिकवण मिळावी म्हणून शिक्षकांनी त्याला एक दिवस बाजारात नेले. तेथे काही चांगले आंबे घेतले आणि  एक सडका आंबाही घेतला . ते सर्व आंबे एका टोपलीत ठेवले. ती टोपली विजयला देऊन गुरूजी म्हणाले," हे बघ, मी दोन दिवसांसाठी बाहेर जात आहे. ही टोपली तुझ्या घरी ठेव. दोन दिवसांनंतर मला हे आंबे शाळेत आणून दे." 
दोन दिवसांनी विजयने आंबे शाळेत आणले. गुरूजींनी त्याला टोपलीचे झाकण उघडायला सांगितले.तर हे काय? सगळे आंबे नासले होते.

तेव्हा शिक्षकांनी विजयला समजावून सांगितले, जसे की एका सडक्या आंब्यामुळे इतर चांगले आंबेही सडून गेले. त्याचप्रमाणे खराब मित्रांमुळे तुझ्यातले चांगले गुण नष्ट होत आहेत, आणि तुझे आयुष्य वाया जात आहे. याचा विजयवर खूप परिणाम झाला, आणि त्याने वाईट मित्रांची संगत सोडून दिली. परत जोमाने अभ्यासाला लागला.  पुन्हा कधीही त्याने वाईट लोकांची संगत केली नाही.

संदेश: वाईट संगत लागल्यास आयुष्य वाईट मार्गाला लागते.

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

केदारनाथ : एक अनुभव

  मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना  वाटेवर एक घोडा मेलेल...