यह ब्लॉग खोजें

शनिवार, 15 अगस्त 2020

वाक्प्रचार 9th std unit 2

 1 ध्यानी ठेवणे - लक्षात ठेवणे

2 - जर्जर करणे - जीर्ण करणे (दशा वाईट करणे)

3 - शिकस्त करणे - खूप प्रयत्न करणे

4 - पर्वणी असणे - खूप आनंददायी घटना वाटणे

5 -  वसवणे - निर्माण करणे

6 - गौरव करणे - सन्मान करणे

7 - तरतूद असणे - उपलब्धी असणे/ व्यवस्था असणे

8 - ख्याती मिळवणे - कीर्ती / प्रसिद्धी मिळवणे

9 - दणाणून सोडणे - नादाने भरून जाणे

10  - संदेश देणे - चांगला विचार किंवा शिकवण देणे

11 - प्रशंसा करणे - स्तुती करणे

12 - गप्पा रंगात येणे - संभाषण रंगणे

13 - विचारात गढून जाणे - विचारात बुडून जाणे

14 - मात करणे - विजय मिळवणे 

15 - हसण्यावारी नेणे - गंभीरपणे दखल न घेणे (to take like a joke)

16 - आव्हान स्वीकारणे - सामना करण्यास सिद्ध होणे

17 - पाठपुरावा करणे - सतत एखाद्या गोष्टीचा ध्यास घेणे

18 - विचारचक्र सुरू होणे - मनात अनेक विचार येणे

19 - पाण्यासारखा पैसा खर्च करणे - पैशांचा ओघ पुरवणे/ खूप पैसा खर्च करणे

20 - फुरसत मिळणे - वेळ मिळणे

21 - फोलपणा जाणवणे - व्यर्थपणा जाणवणे

22 - खटाटोप करणे - खूप प्रयत्न करणे

23 - रोषणाई करणे - दिव्यांच्या माळांनी सजवणे

24 - गवगवा होणे - प्रसिद्धी होणे/ बोलबाला होणे

25 - सन्मान करणे - आदरसत्कार करणे

26 - संकटांना तोंड देणे - संकटांशी सामना करणे

27 -  मरण पावणे - मृत्यू होणे

28 - तपश्चर्या करणे - साधना करणे 

29 - दातकुडी बसणे - दातखिळी बसणे, एक अक्षरही तोंडून न निघणे (locking of jaws due to pain)

30 - डोळे टक्क उघडे पडणे - झोप न लागणे

31 - मेंदूत रुतून बसणे - मनात घट्ट ठसून राहणे

32 - इडं पडणे  - वेढा पडणे ( to be surrounded by)

33 - मान डोलावणे - संमती देणे/ होकार देणे (to nod one's head in agreement)

34 - वावगे वागणे - चुकीचे वागणे

35 - टाळा पगळून बघणे - आश्चर्य वाटणे (to be awestruck)

36 - शिकणे सवरणे - सुशिक्षित होणे ( to be well educated)

37 - डोळयांत पाणी येणे - रडवेले होणे

38 - पोरके होणे - अनाथ होणे



कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

केदारनाथ : एक अनुभव

  मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना  वाटेवर एक घोडा मेलेल...