1 आस लागणे - ध्यास लागणे
2 सादर करणे - कार्यक्रम प्रस्तुत करणे
3 आस्वाद घेणे - गोडी चाखणे
4 नाव खराब करणे - बदनामी करणे
5 इशारा करणे - खूण करणे
6 धीर सुटणे - आत्मविश्वास गमावणे
7 मनात चलबिचल होणे - मन अस्वस्थ होणे
8 सावरून धरणे - आधार देणे
9 डोळे मिटून ध्यान करणे - चित्त एकाग्र करणे
10 धक्का बसणे - मनात हादरणे
11 दगा देणे - धोका देणे
12 शंका मनाला चाटून जाणे - अविश्वास निर्माण होणे
13 नवल वाटणे - आश्चर्य वाटणे
14 ग्रह चांगला होणे - मत चांगला होणे/ अनुकूल मनःस्थिती निर्माण होणे
15 प्रथा असणे - रीत असणे
16 - जिवाचे कान करून ऐकणे - खूप लक्षपूर्वक ऐकणे
17 - दम भरणे - रागावणे
18 चेहरा उतरणे - नाराज होणे
19 पत्ता नसणे - गायब होणे
20 बेचैन होणे - अस्वस्थ होणे
21 इकडची दुनिया तिकडे करणे - आकाश पाताळ एक करणे
22 सांत्वन करणे - दिलासा देणे
23 खिन्न होणे - व्यथित होणे/ निराश होणे
24 अगतिक होणे - लाचार होणे/ हतबल होणे
25 - पायावर डोके ठेवणे - नतमस्तक होणे/ चरणांशी लीन होणे
26 - उद्युक्त करणे - तयार करणे/ प्रेरणा देणे
27 - खेद होणे - खंत असणे, वाईट वाटणे
28 - गडबडून जाणे - गोंधळून जाणे
29 जोर चढणे - चेव चढणे / अंगात बळ संचारणे
30 पाठबळ असणे - पाठिंबा असणे
31 झुंबड लागणे - गर्दी होणे
32 अचंबा वाटणे - नवल वाटणे
33 जामानिमा करून बसणे - आवश्यक ते सामान घेऊन बसणे
34 आ वासून पाहणे/ आ वासून उभे राहणे - आश्चर्यचकित होणे
35 - धीर न होणे - धैर्य नसणे
36 - दवंडी पिटणे - जाहीर करणे
37 आटापिटा करणे - खूप प्रयत्न करणे
38 अफवांचे पीक येणे - खोट्या बातम्यांचा प्रसार होणे
39 फूस लावणे - लालूच दाखवून फसवणे
40 साळसूद डाव असणे - कुटील डाव साधणे ( to make a cunning plan)
41 रवाना होणे - निघून जाणे
42 टेकीला येणे - हैराण होणे/ त्रासणे
43 डंका वाजवणे - प्रसार करणे
44 धाय मोकलणे - जोरा जोराने रडणे
45 धीर चेपणे - हिंमत वाढणे
Yashika khumbati
जवाब देंहटाएं