*नदीचे आत्मकथन*
मी तुमची आवडती नदी आहे.गंगा, भीमा, गोदावरी, कावेरी, ह्या माझ्या बहिणी आहे. त्या माझ्यावर खूप प्रेम करतात. मी झुळझुळ करत अनेक छोट्या गावातून वाहते. माझे पाणी खूप स्वच्छ आणि गोड आहे. तहानलेली माणसे, गुरे, वासरे इथे पाणी प्यायला येतात. त्यांचे समाधानी चेहरे पाहून मला खूप आनंद होतो. दुसऱ्याच्या उपयोगी पडण्याचा समाधान मिळतो.
माझ्या मनात कोणताही मतभेद नाही. सगळेजण माझ्याकडे येऊन माझे पाणी वापरतात. गावातील स्त्रिया दुरून दुरून येऊन पाणी भरतात. त्यांची मुले आनंदाने माझ्या पाण्यात खेळतात. म्हणून मी जरी डोंगरातून धावत खाली आले तरी गावातून जायला मला आवडते. काही भाविक व प्रेमळ त्या माझी पूजा करतात. माझ्या पाण्यामध्ये दिवे सोडतात व मला मातेसमान म्हणतात.
मला नेहमी अनेक भाऊ – बहिणी येऊन मिळायचे. त्यामुळे मी जास्त वेगाने वाढत असे. जसे मी कळसापासून पायथ्यापर्यंत वाहत जाते असे तेव्हा मला अन्य संकटाना सामोरे जावे लागत असे. मी सर्व संकटाना तोंड देऊन आपले ध्येय गाठत असते.
मी एखाद्या शूरवीर योद्ध्या प्रमाणे लढत असते आणि माझ्या जीवनात पुढे जात असते. या सगळ्या संकटांमध्ये माझ्या बहिण – भावंडानी माझी शेवट पर्यंत साथ दिली.
मी मैलोनमैल धावत जाऊन सर्व गावांना माझे शुद्ध जल वाटत राहिले. त्याच बरोबर सर्व पशु – पक्ष्यांची तहान भागवत राहिले. माझ्या पाण्यामुळे सर्व शेते हिरवीगार दिसू लागली.
तसेच कित्येक लोकांनी माझ्या पाण्यावर शेती करून आपले आजीविका भागवली. त्याच बरोबर शहरे पण अन्नधान्य संपन्न झाली.
बहुतेक लोक सुद्धा माझ्या पाण्याचा अति वापर कारखान्यात करू लागले. तसेच कारखान्यातील सांडपाणी माझ्या नदी पात्रात सोडू लागले. त्यामुळे मला खूप काही भोगावे लागले. आज मी अनेक लोकांमुळे प्रदूषित झाले. माझ्या या जल पात्रात अनेक जीव – जंतू, जलचर प्राणी – वनस्पती मरण पावू लागले आहेत. परंतु माणसाला याची काहीच चिंता नाही.
काही ठिकाणी मात्र गावातील घाण पाणी आणून सोडले जाते. कधीकधी गुरे धुतली जातात, स्त्रिया कपडे धुतात व पाणी घाण करतात. त्यांचे मला दुःख होते. लोकांनी शक्यतो माझे पाणी स्वच्छ ठेवले पाहिजे. आजूबाजूला झाडे लावली पाहिजे. आज धरणे बांधून माझे पाणी लांबलांबच्या गावांमध्ये पोचले जाते. त्यामुळे दुष्काळ कमी होतो लोकांच्या उपयोगी पडून माझे जीवन धन्य होत आहे.
मी तुम्हा सर्वाना सगळ्यात शेवटी अशी विनंती करते की, मला प्रदूषित करू नका. कारण माझे पाणी हे तुमच्याच उपयोगासाठी येते
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें