यह ब्लॉग खोजें

बुधवार, 3 दिसंबर 2025

Std 10 शब्दसमूहासाठी एक शब्द

 भिक्षा मागणारा - भिक्षेकरी

कविता लिहिणारा - कवी

लेखन करणारा - लेखक

लिहिता वाचता येणारा - साक्षर

लिहिता वाचता न येणारा - निरक्षर

केलेले उपकार विसरणारा - कृतघ्न

ईश्वर आहे असे मानणारा - आस्तिक

ईश्वर नाही असे मानणारा - नास्तिक

ऐकायला व बोलायला न येणारा - मूकबधिर

भाषण देणारा - वक्ता

ऐकायला न येणारा - बहिरा

भाषण ऐकणारा - श्रोता

कधीही जिंकला न जाणारा - अजिंक्य

कविता करणारी स्त्री - कवयित्री

गाणे गाणारा - गायक

वाद्य वाजवणारा - वादक

कमी वेळ टिकणारे - क्षणभंगुर

केलेले उपकार जाणणारा - कृतज्ञ

दररोज प्रसिद्ध होणारे - दैनिक

महिन्यातून एकदा प्रसिद्ध होणारे - मासिक

पायात जोडे (चपला) नसलेला - अनवाणी

कोई टिप्पणी नहीं:

एक टिप्पणी भेजें

मराठी व्याकरण यूनिट ३

 प्रश्न १ वाक्यांचा प्रकार ओळखा - १ - तुला कोणते पुस्तक हवे ? २ - भारतीय संघ विजयी झाला नाही. ३ - रात्री दरीत उजेड नव्हता. ४- नवविचारांचा सम...