प्र.1 अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती.
1. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा.
i. त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस.
ii. वाह ! आजचा दिवस म्हणजे आनंद व चैतन्याचा उत्सवच जणू !
2. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
i. किती प्रामाणिकपणे सांभाळल्या त्यांनी त्या
शाली ! (विधानार्थी करा.)
ii. आजपासून बसनेच ये-जा करावी. (आज्ञार्थी करा.)
3. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (कोणतेही दोन)
i.मूठभर मास चढणे
ii. उसंत लाभणे
iii. चक्कर मारण
प्र.1 (आ) भाषिक घटकांवर आधारित कृती.
1. शब्दसंपत्ती
i.खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
सगळ्यांत उच्च स्थानावरील -
ii. खालील शब्दांचे समानार्थी शब्द लिहा.
अ. बायको -
ब. पैसा -
खालील शब्दांचे वचन ओळखा.
अ. पाऊल
ब. बांगड्या
iv. खालील शब्दांचे लिंग बदला.
अ. स्त्रिया -
ब. भाचा -
2. लेखननियमांनुसार लेखन अचूक शब्द ओळखून लिहा.
i. मूहूर्त / मुहूर्त / मुहूत / मुहुर्त
ii. सूर्यकिरण / सुर्यकिरण / सूर्यकीरण / सुर्यकीरण
3. विरामचिन्हे
खालील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
" " ! ; ?
Part 2
(अ) व्याकरण घटकांवर आधारित कृती.
1-पुढील वाक्यांचे प्रकार ओळखा.
i. नेहमी दुसऱ्यांना मदत करा.
ii. जगाला प्रेम दयावे.
2. कंसातील सूचनेनुसार वाक्यरूपांतर करा.
i. तुझे अक्षर खूपच सुंदर आहे. (उद्गारार्थी करा.)
ii. माझे दुःख नष्ट व्हावे. (आज्ञार्थी करा.)
3. खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. (कोणतेही दोन)
i. कर्जबाजारी होणे
ii. मळ झाळणे
iii. सुरुंग लावणे
(आ) भाषिक घटकांवर आधारित कृती.
शब्दसंपत्ती
i. खालील शब्दसमूहासाठी एक शब्द लिहा.
मोजके असे बोलणारा -
विरुद्धार्थी शब्द लिहा.
अ. योग्य x
ब. सुखद ×
खालील शब्दांचे वचन बदला.
अ. पत्र -
ब. संकट -