एका गावात रामदास नावाचा एक धनगर होता. त्याला सखाराम नावाचा मुलगा होता. सखाराम रोज आपल्या मेंढया घेऊन गावाबाहेर चरायला घेऊन जात असे. संध्याकाळ झाली की परत आणत असे.
त्याचा हा रोजचा दिनक्रम होता. तो जेथे मेंढ्या चरायला घेऊन जाई तेथे शेती होती. अनेक गावकरी तेथे दिवसभर काम करत असत.
एकदा तो असाच मेंढ्यांना चरायला घेऊन गेला होता. दुपार झाली. त्याने जेवण केले. पण नंतर त्याला फार कंटाळा येऊ लागला. काहीतरी गंमत करायची असे त्याने ठरवले. तो जोरात ओरडला, 'लांडगा आला रे आला !!!"
लोकांना खरे वाटले. ते शेतातली आपली कामे सोडून काठ्या घेऊन धावत त्याच्याजवळ आले. त्याला विचारू लागले, 'कुठे आला लांडगा?' तेव्हा तो मोठ्याने हसू लागला व म्हणाला 'मी तर गंमत केली होती तुमची !"
शेतकरी संतापले. पण करतात काय? तसेच निघून गेले. सखारामला मात्र यात गंमत वाटली. दुसर्या दिवशी त्याने पुन्हा हाच उद्योग केला. शेतकर्यांना उगाचच एक हेलपाटा पडला. पुन्हा सखाराम 'कसे फसवले' म्हणून हसू लागला. शेतकरी संतापून निघून गेले.
तिसर्या दिवशी तो पुन्हा मेंढ्या चरायला घेऊन आला. दुपार झाली आणि तो जेवायला बसला. पण त्या दिवशी खरेच एक लांडगा तेथे आला आणि एका मेंढीवर ताव मारू लागला.
सखाराम जोरजोरात ओरडू लागला 'लांडगा आला रे आला.' पण आजूबाजूच्या लोकांनी त्याला अजिबात भीक घातली नाही. तो नेहमीसारखीच थट्टा करतोय, असे वाटून त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले.
लांडग्याने काही मेंढ्या मारून टाकल्या. सखाराम आपला झाडावर बसून रडू लागला. पण आता काहीच उपयोग नव्हता. त्याला आपली चूक लक्षात आली. पण आता फार उशीर झाला होता.
उपदेश/तात्पर्य ः थट्टा उडविणे केव्हाही वाईटच.
Mam really very nice story.
जवाब देंहटाएंI hope we will get some more writing skills
written by you in future also.
I will only say that your teaching is just awesome!!
- PIYUSH THAKUR
Hello dear Piyush, definitely I m trying to make a good collection of marathi writing skills on this blog so that all my students can be benefited by it. Thank u for a nice comment.
जवाब देंहटाएंThanks 😊🙏 mam
जवाब देंहटाएंThanks 😊🙏
जवाब देंहटाएं