एका गावात एक लाकूडतोड्या राहत होता . तो जंगलात जाऊन झाडांवर चढून लाकडे तोडत असे. एके दिवशी अचानक त्याच्या हातातून त्याची कुर्हाड झाडाखालच्या नदीत कोसळली आणि तो धाय मोकलून रडायला लागला
त्याच्याकडे नवी कुर्हाड घ्यायला मुळीच पैसे नव्हते आणि त्याच्या कुटुंबाचे पोट त्याच्या या कुर्हाडीवरच चालत असे. तो झाडे तोडून लाकडं विकून पैसे जमवत असत.
हे सारं वनातल्या देवाने पाहिलं . तो त्या लाकूडतोड्याची परीक्षा घेण्यासाठी रूप बदलून तेथे आला आणि त्याला रडण्याचे कारण विचारले. लाकूडतोड्याने त्याला झालेला सगळा प्रकार सांगितला आणि त्याला कुर्हाड मिळवण्यासाठी मदत करण्याची प्रार्थना केली.
देवाने पाण्यात उडी घेतली. आधी त्याने एक सोन्याची कुर्हाड काढली आणि त्या लाकूडतोड्याला विचारले - "ही का तुझी कुर्हाड?"
लाकूडतोड्या म्हणाला, "नाही". मग देवाने चांदीची कुर्हाड काढली. लाकूडतोड्या म्हणाला, "हीसुद्धा माझी कुऱ्हाड नाही."
मग देवाने त्याची खरी कुर्हाड नदीतून बाहेर काढली आणि विचारले - "मग ही आहे का तुझी कुऱ्हाड?" लाकूडतोड्याला खूपच आनंद झाला. तीच त्याची खरी कुर्हाड , लोखंडाची कुऱ्हाड होती.
देव आपल्या खऱ्या रूपात आला आणि विचारले -"मी तुला आधी सोने आणि चांदीची कुर्हाड दिली, तरी तू त्याला नाही का म्हणालास?" लाकूडतोड्या देवाला म्हणाला, "प्रभू माफ करा परंतु जी वस्तू माझी नाही तिला मी माझी का म्ह़णू? मी बेईमानी करू शकत नाही."
देव त्याच्या या उत्तरावर खूश झाला. त्याला त्या तीनही कुर्हाडी भेट दिल्या.
तात्पर्य: तुम्ही तुमचे काम अगदी प्रामाणिकपणे केले तर, देव आणि दैवं तुम्हाला कितीतरी पटीने अधिक देते.
this story , I feel is from Panchatantra.
जवाब देंहटाएंYes sir, exactly. Thank u so much for helping and guiding everytime.
हटाएंप्रिय मीना, बहुत बहुत बधाई और शुभकामनायें इस सुंदर ब्लॉग के लिए। ये बच्चों के लिए एक अनमोल थाती रहेगा। और एक शिक्षिका के रूप आपकी प्रतिष्ठा में चार चाँद लगायेगा। पुनः शुभकामनायें 🌹🌹🌹🌹💐💐💐🌷🌷🌷🌷
जवाब देंहटाएं