यह ब्लॉग खोजें

रविवार, 9 जुलाई 2023

केदारनाथ : एक अनुभव

  मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना  वाटेवर एक घोडा मेलेला आहे असे मला दिसले. जवळ आल्यावर कळले की मेलेला नाही. त्याचे श्वास चालू होते.  सगळेजण आजूबाजूने जात होते. त्या मुक्या प्राण्याकडे लक्ष द्यायला वेळ कुठे होता लोकांकडे ! तिथे एक एक घोडेवाला तीन चार घोडे एकाच वेळी सांभाळतो. घोड्यावर बसायला भीती वाटते. अक्षरशः स्पर्धा करतात एकमेकांशी. 

असो. मला तो घोडा दिसला. मी जरा जवळ गेले. त्याचे श्वास चालू होते. मान टाकलेली होती पण पोट वर खाली होत होते. मी ही इतरांप्रमाणे पुढे गेले. का कोण जाणे पण मला अशी प्रेरणा झाली की तुझ्याकडे गंगोत्रीवरून आणलेले गंगाजल आहे. ते त्याच्या तोंडात टाक. माणसाच्या शेवटच्या क्षणी आपण गंगाजल देतो ना त्याच्या तोंडात ? मग या बिचाऱ्या प्राण्याला का देऊ नये? मी परत त्या घोड्याजवळ आले. गंगोत्रीवरून आणलेली गंगाजलाची मोठी बाटली काढली.  सकाळी केदारनाथावर अभिषेक करताना थोडे गंगाजल वापरले होते. गंगोत्रीवरून आणलेले गंगाजल आणि शुद्ध तूप यांनीच केदारनाथाचे अभिषेक केले जाते.

मी ती अर्धी बाटली गंगाजल त्या घोड्याच्या तोंडात टाकले. फक्त थोडे घरी घेऊन जाण्यासाठी ठेवले.भीतीही वाटत होती की हा एकदम उठला तर ? पण तो उठला नाही. पाणी त्याच्या तोंडात गेले  की नाही,माहीत नाही. पण त्याच्या तोंडातून एकदम रक्ताची धार वाहू लागली. मी घाबरून मागे हटले आणि वाट चालायला लागले. दहा वीस कदम पुढे जाऊन मागे पाहते तर त्याने मान वर केली होती व मला केविलवाण्या नजरेने बघत होता. थोडे पुढे जाऊन बघितले तर अजूनही तो माझ्या दिशेने बघत होता. मला दया येत होती त्याची, पण मी काही करू शकत नव्हते.  माझा ग्रुप पुढे गेला होता. मी भराभर चालायला लागले. पाय लटपटत होते. 

खाली रामबाड़ाला (केदारनाथ ते गौरीकुंड मार्गावर पूर्वी असलेले एक ठिकाण ) येईपर्यंत माझ्या पायांनी जवाब दिला आणि मजबूर होऊन शेवटचा सात किलोमीटरचा मार्ग उतरताना मला घोडा करावाच लागला. 

मीना शर्मा 

(30/05/2012)



शुक्रवार, 11 फ़रवरी 2022

चांगली संगत करा

 [ शाळेत जाणारा कष्टाळू व प्रामाणिक मुलगा  - वाईट मित्रांची संगत - शिक्षकांना काळजी मुलाला घेऊन बाजारात फेरफटका - उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी - एक खराब झालेला आंबा त्यांमध्ये ठेवणे - दोन दिवसांनी पाहणी - नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब - संदेश.] - 

एका गावात विजय नावाचा एक मुलगा होता. स्वतः प्रामाणिकपणे अभ्यास करून कष्टाने तो शाळेत जात असे. त्याच्या या गुणाने तो शिक्षकांमध्येही प्रिय होता.

पण त्याला वाईट मित्रांची संगत लागली. त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. शाळा बुडवणे, व्यसने करणे अशा वाईट मार्गाला तो लागला.त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर झाल्याने तो नापास झाला. शिक्षकांच्या ते लक्षात आले व त्यांना सगळे समजले.
त्याला शिकवण मिळावी म्हणून शिक्षकांनी त्याला एक दिवस बाजारात नेले. तेथे काही चांगले आंबे घेतले आणि  एक सडका आंबाही घेतला . ते सर्व आंबे एका टोपलीत ठेवले. ती टोपली विजयला देऊन गुरूजी म्हणाले," हे बघ, मी दोन दिवसांसाठी बाहेर जात आहे. ही टोपली तुझ्या घरी ठेव. दोन दिवसांनंतर मला हे आंबे शाळेत आणून दे." 
दोन दिवसांनी विजयने आंबे शाळेत आणले. गुरूजींनी त्याला टोपलीचे झाकण उघडायला सांगितले.तर हे काय? सगळे आंबे नासले होते.

तेव्हा शिक्षकांनी विजयला समजावून सांगितले, जसे की एका सडक्या आंब्यामुळे इतर चांगले आंबेही सडून गेले. त्याचप्रमाणे खराब मित्रांमुळे तुझ्यातले चांगले गुण नष्ट होत आहेत, आणि तुझे आयुष्य वाया जात आहे. याचा विजयवर खूप परिणाम झाला, आणि त्याने वाईट मित्रांची संगत सोडून दिली. परत जोमाने अभ्यासाला लागला.  पुन्हा कधीही त्याने वाईट लोकांची संगत केली नाही.

संदेश: वाईट संगत लागल्यास आयुष्य वाईट मार्गाला लागते.

माझे आवडते शिक्षक

  मी झुलेलाल ट्रस्ट या शाळे मध्ये शिकतो . माझ्या शाळेत अनेक शिक्षक आहेत. त्यातील काही माझे वर्ग घेतात.मी त्या सर्वांना ओळखतो. मला माझे सर्व शिक्षक आवडतात. ते सर्व खूप दयाळू आणि प्रेमळ आहेत. परंतु माझे आवडते शिक्षक म्हणजे श्री विशाल देशमुख  सर.

ते आमचे मराठी भाषेचे शिक्षक आहे. त्यांचे व्यक्तिमत्व साधे सरळ आहे, साधी राहणी आहे आणि आपल्या विषयाचे ते एक मास्टर आहे. ही एक गुणवत्ता आहे जी सर्व विद्यार्थ्यांना प्रभावित करते. ते खूप शिस्तबद्ध आहे परंतु इतके कठोर नाही की विद्यार्थी त्याच्यापासून घाबरून काही प्रश्नच विचारणार नाही. खरं तर, जेव्हा ते आजूबाजूला असतात तेव्हा आम्हाला खूप समाधान वाटते.

मराठी मध्ये ज्या कविता असतात, त्यांचा अर्थ विशाल सर अगदी सोप्या भाषेत समजावून देतात. जर कुणालाही एखाद्या कवितेचा अर्थ किंवा शिकविलेला पाठ समजला नाही तर ते दुसऱ्या दिवशी पुन्हा समजावून सांगतात. विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी ते नेहमी तयार असते. ते कोणत्याही मुलाला मदतीसाठी कधीही नकार देत नाही. विद्याथर्यानी निबंध, लेख, कविता वगैरे स्वतः बनवून लिहावे, पाठ्येतर वाचन ही भरपूर करावा यावर ते भर देतात.

ते आम्हांला मराठी बातमीपत्र व गोष्टींची पुस्तके वाचायला लावतात त्यामुळे आमची भाषा खूप सुधारली आहे. मराठी निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा,  वाद विवाद स्पर्धा आयोजित करून ते आम्हाला त्यासाठी तयार करतात. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला व मी चारचौघांमध्ये बोलायला शिकलो. या गुणांमुळे विशाल सर माझेच नाही तर सर्वांचेच आवडते शिक्षक आहेत.

सोमवार, 7 फ़रवरी 2022

शेतकऱ्याचे आत्मवृत

 शेतकऱ्याचे आत्मवृत्त :-

मी एक कोरडवाहू शेतकरी आहे. पावसाच्या पाण्यावर माझी शेती अवलंबून असते. पावसाच्या पाण्याचा थेंबन् थेंब मी उपयोगात आणतो. माझे कुटुंब छोटे आहे मी, माझी पत्नी आणि दोन मुले. माझी दोन्ही मुले शाळेत जातात. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही खूप कष्ट करतो.


हा कधी पाऊस रुसतो, अजिबात पडत नाही. कधी खूप कोसळतो. कधी अवेळी पडतो. कधी केलेली पेरणी फुकट जाते. तर कधी तयार झालेले पीक पाण्यात वाहून जाते वा कुजते. या साऱ्या संकटांचा सामना करायला आम्ही आता शिकलो आहोत. पण जेव्हा पाऊस वेळेवर व हवा तेवढाच पडतो, तेव्हा आमचे शेत फुलून येते.पिकवलेले धान्य घरात आले की माझे मन तृप्त होते. हीच आम्हां शेतकऱ्यांची श्रीमंती.

 मी नेहमी आलटून-पालटून वेगवेगळी पिके घेतो, त्यामुळे जमिनीचा कस टिकून राहतो. शेताबरोबर मी छोटासा मळाही फुलवतो. मळ्यातील फळे, फुले विकून मला घरखर्चाला पैसा मिळतो. नेहमी पीक देणारी चिंच, नारळ अशी काही झाडेही मी लावली आहेत.

शेतात एखादे पीक खूप आले की पिकाचे भाव पडतात. शेतकऱ्याचे नुकसान होते. पिकावर रोग पडू नये याची खूप काळजी घ्यावी लागते. वेळेवर औषधे फवारावी लागतात. मला माझ्या काळ्या आईची सेवा करण्यात खरोखर धन्यता वाटते.

शनिवार, 29 जनवरी 2022

माझा आवडता ऋतू वसंत

 वसंत ऋतू फाल्गुन व चैत्र महिन्यांत येतो. सर्व ऋतूंमध्ये सुंदर व बहारदार ऋतू आहे- वसंत ऋतू म्हणून तर याला 'ऋतुराज' म्हणतात. वसंत ऋतूमध्ये हवा खूप सुखद असते. हिवाळा संपू लागतो. वातावरण प्रसन्न वाटते. 

वसंत ऋतूत वृक्षवेलींना नवीन पालवी येते. रंगीबेरंगी फुले फुलू लागतात. आंब्याच्या झाडांना मोहर येतो. पळसाची लाल नारंगी रंगाची फुले फुलू लागतात. फुलपाखरे शेतांत व बागांत बागडू लागतात. कोकीळ पक्षी मधुर गायन सुरु करतो. निसर्गाचे सर्व घटक, सगळे वृक्ष, पशु, पक्षी, वसंताचे स्वागत करण्यासाठी सज्ज होतात. 

पिंपळ, क्ड, लिंब, आंबा अशा अनेक झाडांवर गर्द पोपटी हिरवी पालवी फुटते. ज्या झाडांची पाने पानझडीच्या काळात पडून गेली होती, त्या झाडांवर कोवळी हिरवी लुसलुशीत पाने येतात. अनेक प्रकारचे रंगीबेरंगी सुंदर सुंदर पक्षीही झाडांवर दिसू लागतात.

शेतांत गव्हाचे पीक डोलू लागते. मोहरीच्या पिवळयाधम्मक फुलांचे गालीचे शेतांवर पसरलेले दिसतात. निसर्गाचे सौंदर्य या ऋतूत मनाला भुरळ पाडते. सृष्टी जणू रंगाचा व सुगंधाचा  उत्सव साजरा करत आहे, असे वाटते. लोकांचे मनही उत्साहाने भरलेले असतात, हिवाळयात मनावर आलेली मरगळ व आळस दूर होते. गोड गोड द्राक्षे, ऊस, कलिंगड, आंबे व अनेक प्रकारची फळे पिकायला लागतात. शिवरात्री, होळी, वसंतपंचमी, रंगपंचमी, असे अनेक सण या ऋतूत येतात व मनाला धुंद करतात. 

आनंदाने, ऊर्जेने व चैतन्याने भरलेला हा वसंत ऋतू मला खूप आवडतो.

रविवार, 16 जनवरी 2022

शब्द एक, अर्थ अनेक


शब्द

√अभंग

 त्याचे अर्थ

न भंगलेला, काव्यरचनेचा  एक  प्रकार 
√अनंतपरमेश्वर, अमर्याद
√अंगशरीर, बाजू, भाग
√अंकसंख्या, मांडी
√अंबरआकाश, वस्त्र
√अंतरमन, लांबी, भेद, फरक




√ओढाआकर्षण, मनाचा कल, पाण्याचा लहान ओघ
√उत्तरप्रश्नाचे उत्तर (खुलासा), एका दिशेचे नाव
√ऋणवजाबाकीचे चिन्ह, कर्ज
√ करहात, सरकारी सारा
√कलमरोपांचे कलम, लेखणी
√ कळवेदना, गुप्त किल्ली
√कर्णमहाभारतातील योद्धा, कान
√काळवेळ, मृत्यू, यम








√ गार थंड, बर्फाची गोटी
√ घटझीज, मडके
√ घाटडोंगरातला रस्ता, नदीच्या पायऱ्या
√ चक्र चाक,एक शस्त्र
√ चरणपाय, ओळ




चिरंजीवमुलगा, दीर्घायुषी


√ छंदनाद, काव्यरचनेचा एक प्रकार
√जलदलवकर, ढग 


√जातसमाज, प्रकार 
जोडाबूट, जोडपे
जीवनआयुष्य, पाणी
डावकपट, कारस्थान, खेळी
तट कडा,किनारा,किल्ल्याची भिंत
तीर काठ,बाण,बांध
दंड काठी,शिक्षा,बाहू
द्वीजपक्षी, दात, ब्राह्मण
धनी  श्रीमंत मनुष्य,मालक


धडापाठ,रिवाज


नग पर्वत,वस्तू
नाव नाव,होडी
नाद छंद,आवाज,आवड
पय पाणी,दूध 
पत्र पान,चिठ्ठी
पक्ष पंख,पंधरवडा




पानजेवणाचे ताट, वहीचे पान, झाडाचे पान 


√पालकआईवडील, पालनपोषण करणारे, एक पालेभाजी








√भाव भक्ती,किंमत,भावना,दर
√मान शरीराचा एक अवयव,प्रतिष्ठा
√माया धन,ममता
√माळ फुलांचा हार,ओसाड जागा


√रक्षारक्षण,राख
√ वर वरदान ,नवरा,वरची दिशा
 
 
√वचन बोललेले शब्द , कौल
√वात ज्योत,वारा
√वार दिवस,घाव
√वाणी व्यापारी,उद्गार,बोलणे
√सुमन फूल,पवित्र मन
√हार पराभव,फुलांची माळ

रविवार, 28 नवंबर 2021

Std 10th वाक्प्रचार Unit 4

पाठ 13

1) धारण करणे - अंगिकारणे, पांघरणे

देवाने आपल्या भक्तांसाठी निरनिराळी रूपे धारण केली.

Or

पावसात धरणीने हिरवे परिधान धारण केले.

2) घाव घालणे - प्रहार करणे, हत्याराने जोराने मारणे

माणसाने आपल्या स्वार्थासाठी झाडांवर घाव घातला.

3) टक लावून पाहणे - एकाच गोष्टीकडे नजर खिळवणे 

पौर्णिमेचा चंद्र एवढा सुंदर दिसत होता की लोक त्याच्याकडे टक लावून पाहत होता.

पाठ 14 बीज पेरले गेले

1) हेवा वाटणे - मत्सर वाटणे

गुरुजी श्यामचे एवढे कौतुक करत की सर्वांना त्याचा हेवा वाटू लागला.

2) जमा करणे - गोळा करणे, संग्रह करणे

मला शंखशिंपले जमा करण्याचा छंद आहे.

3) कानावर येणे - ऐकिवात येणे/ ऐकण्यात येणे

कोरोनामुळे दहावीच्या परीक्षा रद्द होतील असे कानावर आले आहे.

4) जिवावर येणे - त्रास होणे, वाईट वाटणे

मला स्वयंपाक करणे नेहमी जिवावर येते.

Or

मला व्यायाम करणे नेहमी जिवावर येते.

5) नाव उज्जवल करणे - नावारूपाला येणे, प्रसिद्ध होणे

रघुनाथ माशेलकर यांनी खूप मोठे शास्त्रज्ञ बनून आपल्या देशाचे नाव उज्जवल केले.

4) कवेत घेणे - मिठीत घेणे, कुशीत घेणे

सहलीतून मी घरी येताच आईने मला कवेत घेतले.

5) मरगळ झटकणे - आळस सोडणे 

पहिला पाऊस पडताच शेतकरी मरगळ झटकून कामाला लागले.

6) मन घट्ट करणे - मन आवरणे, मन शांत करणे

आईने मन घट्ट करून मुलाला रणांगणावर पाठवले.

7) निरोप घेणे - विदा घेणे

जेवणानंतर पाहुण्यांनी आमचा निरोप घेतला.

8) वेगळे वळण लागणे - वेगळी दिशा मिळणे 

कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यानंतर मुलांच्या आयुष्याला एक वेगळेच वळण लागते.

9) भुरळ पडणे - मोह होणे, आवड निर्माण होणे

काश्मीरचे निसर्गसौंदर्य पाहून मला भुरळ पडली.

10) दांडी उडवणे - त्रिफळा उडवणे to take a wicket

 पहिल्याच चेंडूवर रामने मोहनची दांडी उडवली.

11) उत्तेजन मिळणे  - प्रोत्साहन मिळणे 

मला माझ्या गुरूजींकडून चित्रे काढण्यासाठी उत्तेजन मिळाले.

12) छाती आनंदाने फुगणे - अभिमानाने खूप आनंद होणे

मुलगा डॉक्टर झाल्यावर वडिलांची छाती आनंदाने फुगली.

13) आनंद गगनात न मावणे - अतिशय आनंद होणे

मी क्रिकेटच्या राष्ट्रीय संघात निवडून आलो तेव्हा माझा आनंद गगनात मावत नव्हता.

14) शाळा न चुकवणे - शाळेत नियमित जाणे

दीपाने आजपर्यंत कधीही शाळा चुकवली नाही.

15 ) हातवारे करणे - इशारा करणे 

जादूगर जादूचे खेळ दाखवताना हातवारे करून काहीतरी बडबडत होता.

16) झिम्मड उडणे - खूप गर्दी होणे

चूडीवाला गावात आला की बायकांची झिम्मड उडते.

17) काळजाला भिडणे - खूप आवडणे

कवयित्री शांता शेळके यांच्या कविता थेट काळजाला भिडतात

18) मान लाजेने खाली जाणे - शरम वाटणे

परीक्षेत नापास झाल्यामुळे सुरेशची मान लाजेने खाली गेली.

19) मान वर होणे - अभिमानाने मन भरून येणे

रामने जेव्हा क्रिकेटच्या आंतरशालेय सामन्यात शंभर धावे केले तेव्हा त्याची मान वर झाली.

20 ) शाबासकीची थाप देणे - खूप कौतुक करणे 

जेव्हा निलेशने चार मुलींचे जीव वाचवले तेव्हा सगळेजण त्याला शाबासकीची थाप देत होते.

L 15 खरा नागरिक - 

1) सल्ला देणे - उपदेश करणे

संजयने शेती करणे सोडून नोकरी करावी असा सल्ला त्याच्या मित्रांनी दिला.

2) नाव दाखल करणे - प्रवेश घेणे

वडिलांनी आमितचे नाव सैनिक शाळेत दाखल केले.

3) वार लावून जेवणे - आठवड्याचे सात दिवशी वेगवेगळया कुटुंबात पाहुणा म्हणून भोजन करणे

गरिबीमुळे निरंजनला वार लावून जेवावे लागले.

4) श्रद्धा ठेवणे - मनापासून विश्वास असणे

माझी आजी देवावर अगाध श्रद्धा ठेवते.

5) झटून अभ्यास करणे - चिकाटीने खूप अभ्यास करणे

संजय नेहमी झटून अभ्यास करतो, म्हणूनच तो वर्गात प्रथम येतो.

6) वेळ लोटणे - वेळ जाणे 

आईला बाहेर जाऊन खूप वेळ लोटला होता , तरीही ती घरी आली नव्हती.

7) पार करणे - अंतर कापणे

नदीवरचे पूल पार केल्यावर आम्ही दुसऱ्या गावात पोचलो.

8) जीवाला मुकणे - प्राण गमावणे

यावर्षी कोरोना महामारीमुळे शेकडो लोक जीवाला मुकले.

9) हुरळून जाणे - खूप आनंद होणे

लॉटरी लागल्याची बातमी ऐकताच मी हुरळून गेलो.

10) ध्यानी येणे - लक्षात येणे

अचानक माझ्या ध्यानी आले की मी बाहेर निघताना घराला कुलूप लावलेले नाही.

11) आश्चर्य वाटणे - चकित होणे 

नेहमी हरणाऱ्या मोहनने कुश्तीचा सामना जिंकला, हे पाहून लोकांना खूपच आश्चर्य वाटले.

12) कट रचणे - षडयंत्र रचणे, कारस्थान रचणे

औरंगजेबने संभाजीराजे यांची हत्या करण्याचा कट रचला.

13) धाव घेणे -  जोरात पळणे

ट्रेन सुटु नये म्हणून मी स्टेशनकडे धाव घेतली.

14) आर्जव करणे - कळवळून विनंती करणे 

मोहनने गुरुजींकडे आर्जव केले की त्याची या वर्षाची फी माफ करावी.

15) ताब्यात देणे -  सोपवणे 

मला रस्त्यावर एक सोन्याची चेन सापडली होती, ती मी पोलिसांच्या ताब्यात दिली.

16) तथ्य वाटणे - खरे वाटणे

पोलिसांना रामूच्या बोलण्यात तथ्य वाटत होता.

17) आदेश देणे - हुकूम करणे 

साधूने रामेश्वरला दोन हजार रुपए आणण्याचा आदेश दिला.

18)  पंचनामा करणे - लेखी चौकशी अहवाल तयार करणे

अपघाताच्या ठिकाणी लगेच पोलिस दल आले व त्यांनी घटनेचा पंचनामा केला.

19) रद्द होणे - बंद होणे

कोरोनामुळे गेल्या वर्षी दहावीच्या परीक्षा रद्द झाल्या.

20) श्रेय देणे - 

अजय ने बोर्डात प्रथम येण्याचा श्रेय आपल्या आई वडिलांना दिला.

21) पाय धरणे - शरण येणे

आरूणीने धावत जाऊन गुरुजींचे पाय धरले.

22) वाया जाणे - फुकट जाणे

कोरोनामुळे अनेक लोकांचा एक वर्ष वाया गेला.

23) हृदयाशी धरणे - मायेने कुशीत घेणे/ मिठी मारणे

आई ने बाळाला हृदयाशी धरले.

24) डोळे पाणावणे - डोळयांत अश्रू येणे

विठ्ठलाचे दर्शन झाल्यावर कृतज्ञतेने शेतकऱ्याचे डोळे पाणावले.

पाठ 16 स्वप्न करू साकार (poem)

1) स्वप्न साकार करणे - भविष्यातील स्वप्न पूर्ण करणे

रामू खूप शिकून डॉक्टर झाला व त्याने आपल्या आई वडिलांचे स्वप्न साकार केले.

2) ललकार घुमवणे - जयजयकार करणे

सैनिकांनी आभाळावर छत्रपती शिवाजी महाराजांचा ललकार घुमवला.

3) नौबत झडणे - मोठा नगारा किंवा डंका वाजणे

भारत देशाच्या बलशाली एकजुटीची नौबत वाजायला लागली आहे.





केदारनाथ : एक अनुभव

  मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना  वाटेवर एक घोडा मेलेल...