यह ब्लॉग खोजें

शुक्रवार, 11 फ़रवरी 2022

चांगली संगत करा

 [ शाळेत जाणारा कष्टाळू व प्रामाणिक मुलगा  - वाईट मित्रांची संगत - शिक्षकांना काळजी मुलाला घेऊन बाजारात फेरफटका - उत्तम प्रतीच्या आंब्याची खरेदी - एक खराब झालेला आंबा त्यांमध्ये ठेवणे - दोन दिवसांनी पाहणी - नासक्या आंब्यामुळे बाकीचे आंबे खराब - संदेश.] - 

एका गावात विजय नावाचा एक मुलगा होता. स्वतः प्रामाणिकपणे अभ्यास करून कष्टाने तो शाळेत जात असे. त्याच्या या गुणाने तो शिक्षकांमध्येही प्रिय होता.

पण त्याला वाईट मित्रांची संगत लागली. त्याचे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. शाळा बुडवणे, व्यसने करणे अशा वाईट मार्गाला तो लागला.त्याचा परिणाम त्याच्या अभ्यासावर झाल्याने तो नापास झाला. शिक्षकांच्या ते लक्षात आले व त्यांना सगळे समजले.
त्याला शिकवण मिळावी म्हणून शिक्षकांनी त्याला एक दिवस बाजारात नेले. तेथे काही चांगले आंबे घेतले आणि  एक सडका आंबाही घेतला . ते सर्व आंबे एका टोपलीत ठेवले. ती टोपली विजयला देऊन गुरूजी म्हणाले," हे बघ, मी दोन दिवसांसाठी बाहेर जात आहे. ही टोपली तुझ्या घरी ठेव. दोन दिवसांनंतर मला हे आंबे शाळेत आणून दे." 
दोन दिवसांनी विजयने आंबे शाळेत आणले. गुरूजींनी त्याला टोपलीचे झाकण उघडायला सांगितले.तर हे काय? सगळे आंबे नासले होते.

तेव्हा शिक्षकांनी विजयला समजावून सांगितले, जसे की एका सडक्या आंब्यामुळे इतर चांगले आंबेही सडून गेले. त्याचप्रमाणे खराब मित्रांमुळे तुझ्यातले चांगले गुण नष्ट होत आहेत, आणि तुझे आयुष्य वाया जात आहे. याचा विजयवर खूप परिणाम झाला, आणि त्याने वाईट मित्रांची संगत सोडून दिली. परत जोमाने अभ्यासाला लागला.  पुन्हा कधीही त्याने वाईट लोकांची संगत केली नाही.

संदेश: वाईट संगत लागल्यास आयुष्य वाईट मार्गाला लागते.

माझे आवडते शिक्षक

  मी झुलेलाल ट्रस्ट या शाळे मध्ये शिकतो . माझ्या शाळेत अनेक शिक्षक आहेत. त्यातील काही माझे वर्ग घेतात.मी त्या सर्वांना ओळखतो. मला माझे सर्व शिक्षक आवडतात. ते सर्व खूप दयाळू आणि प्रेमळ आहेत. परंतु माझे आवडते शिक्षक म्हणजे श्री विशाल देशमुख  सर.

ते आमचे मराठी भाषेचे शिक्षक आहे. त्यांचे व्यक्तिमत्व साधे सरळ आहे, साधी राहणी आहे आणि आपल्या विषयाचे ते एक मास्टर आहे. ही एक गुणवत्ता आहे जी सर्व विद्यार्थ्यांना प्रभावित करते. ते खूप शिस्तबद्ध आहे परंतु इतके कठोर नाही की विद्यार्थी त्याच्यापासून घाबरून काही प्रश्नच विचारणार नाही. खरं तर, जेव्हा ते आजूबाजूला असतात तेव्हा आम्हाला खूप समाधान वाटते.

मराठी मध्ये ज्या कविता असतात, त्यांचा अर्थ विशाल सर अगदी सोप्या भाषेत समजावून देतात. जर कुणालाही एखाद्या कवितेचा अर्थ किंवा शिकविलेला पाठ समजला नाही तर ते दुसऱ्या दिवशी पुन्हा समजावून सांगतात. विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी ते नेहमी तयार असते. ते कोणत्याही मुलाला मदतीसाठी कधीही नकार देत नाही. विद्याथर्यानी निबंध, लेख, कविता वगैरे स्वतः बनवून लिहावे, पाठ्येतर वाचन ही भरपूर करावा यावर ते भर देतात.

ते आम्हांला मराठी बातमीपत्र व गोष्टींची पुस्तके वाचायला लावतात त्यामुळे आमची भाषा खूप सुधारली आहे. मराठी निबंध स्पर्धा, भाषण स्पर्धा,  वाद विवाद स्पर्धा आयोजित करून ते आम्हाला त्यासाठी तयार करतात. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला व मी चारचौघांमध्ये बोलायला शिकलो. या गुणांमुळे विशाल सर माझेच नाही तर सर्वांचेच आवडते शिक्षक आहेत.

सोमवार, 7 फ़रवरी 2022

शेतकऱ्याचे आत्मवृत

 शेतकऱ्याचे आत्मवृत्त :-

मी एक कोरडवाहू शेतकरी आहे. पावसाच्या पाण्यावर माझी शेती अवलंबून असते. पावसाच्या पाण्याचा थेंबन् थेंब मी उपयोगात आणतो. माझे कुटुंब छोटे आहे मी, माझी पत्नी आणि दोन मुले. माझी दोन्ही मुले शाळेत जातात. मी आणि माझी पत्नी आम्ही दोघेही खूप कष्ट करतो.


हा कधी पाऊस रुसतो, अजिबात पडत नाही. कधी खूप कोसळतो. कधी अवेळी पडतो. कधी केलेली पेरणी फुकट जाते. तर कधी तयार झालेले पीक पाण्यात वाहून जाते वा कुजते. या साऱ्या संकटांचा सामना करायला आम्ही आता शिकलो आहोत. पण जेव्हा पाऊस वेळेवर व हवा तेवढाच पडतो, तेव्हा आमचे शेत फुलून येते.पिकवलेले धान्य घरात आले की माझे मन तृप्त होते. हीच आम्हां शेतकऱ्यांची श्रीमंती.

 मी नेहमी आलटून-पालटून वेगवेगळी पिके घेतो, त्यामुळे जमिनीचा कस टिकून राहतो. शेताबरोबर मी छोटासा मळाही फुलवतो. मळ्यातील फळे, फुले विकून मला घरखर्चाला पैसा मिळतो. नेहमी पीक देणारी चिंच, नारळ अशी काही झाडेही मी लावली आहेत.

शेतात एखादे पीक खूप आले की पिकाचे भाव पडतात. शेतकऱ्याचे नुकसान होते. पिकावर रोग पडू नये याची खूप काळजी घ्यावी लागते. वेळेवर औषधे फवारावी लागतात. मला माझ्या काळ्या आईची सेवा करण्यात खरोखर धन्यता वाटते.

केदारनाथ : एक अनुभव

  मी 2012 मे महिन्यात केदारनाथला गेले होते. पायी गेलो होतो आम्ही पण दोन सीनीयर सिटीजन डोली मध्ये गेले. परत खाली येताना  वाटेवर एक घोडा मेलेल...