1 जीव ओवाळणे - जीवन कुर्बान करणे/ प्रेममय श्रद्धा दाखवणे
आई आपल्या बाळांवर जीव ओवाळून टाकते.
2 डोळे भरून पाहणे - ममत्वाने कौतुकाने बघणे
आपल्या देशाच्या सैनिकांची कामगिरी लोक डोळे भरून पाहतात.
3 राखण करणे - रक्षण करणे
सैनिक आपल्या देशाची रात्रंदिवस राखण करतात.
4 बोट रोखणे - बोटाने इशारा करणे
बाजारात लहान बाळाने खेळणीच्या दुकानाकडे बोट रोखले.
5 खूण करणे - इशारा करणे
बाजारात लहान बाळाने खेळणीच्या दुकानाकडे खूण केली.
6 अदृश्य होणे - नाहीसे होणे
देव गरीब माणसाला वरदान देऊन अदृश्य झाला.
7 हळहळणे - चुकचुकणे, चिंता होणे
माझ्या गुलाबाच्या झाडावर आलेले पहिले फूल कुणीतरी तोडून नेले, म्हणून मी हळहळलो.
8 शरमिंदे वाटणे - लाज वाटणे
परीक्षेत नापास झाल्यामुळे सूरजला शरमिंदे वाटले.
9 मागे पुढे न बघणे - विचार न करता तत्परतेने कार्य करणे
चांगले कार्य करण्यासाठी मी कधीही मागे पुढे बघत नाही.
10 दडपण येणे - मनावर दबाव येणे
दहावीच्या परीक्षेची एवढी भीती दाखवली जाते की मुलांवर दडपण येते.
11 अधीर होणे - उत्सुक होणे/ धीर न धरणे
मी लॉकडाऊननंतर आपल्या मित्रांना भेटण्यासाठी अधीर झालो होतो.
12 सावधगिरी बाळगणे - अति सावध होणे
रात्रीच्या वेळी एकटे बाहर जाताना सावधगिरी बाळगली पाहिजे.
13 पाय न वाजवता जाणे - अगदी हळू चालणे
जंगलातून जाताना आपण पाय न वाजवता गेले पाहिजे.
14 हृदय जोराने धडधडणे - भीतीने हुरहुर वाटणे
15 घसा कोरडा पडणे - भीती वाटणे
समोर वाघाला पाहून भीतीने माझा घसा कोरडा पडला
16 चौकस राहणे - सावधपणा ठेवणे
जंगलातून जाताना आपण चौकस राहिले पाहिजे
17 अंगावर सरसरून काटा येणे - भीतीने शहारणे
समोरून दोन साप जाताना पाहून माझ्या अंगावर सरसरून काटा आला
18 आश्चर्यने थक्क होणे - चकित होणे
जादूचे खेळ पाहून मुले आश्चर्याने थक्क झाली
19 उत्साहाचे वारे भरणे - अतिशय उत्साह वाटणे
गुरुजींनी प्रोत्साहन दिल्यामुळे सुहासच्या अंगात उत्साहाचे वारे भरले होते.
20 राबता असणे - सतत हालचाल असणे
जंगलाजवळ असल्यामुळे त्या गावात कोल्हा, लांडगा, बिबट्या अशा रानटी प्राण्यांचा राबता होता.
21 खबरदारी घेणे - जिवाची काळजी घेणे
नदीकाठी राहणाऱ्या लोकांना पावसाळ्यात खबरदारी घेतली पाहिजे.
22 दक्ष असणे - सावध असणे
प्राणी व पक्षी आपल्या लहान पिल्लांच्या सुरक्षेच्या बाबतीत दक्ष असतात.
23 उत्साहाला उधाण येणे - मनात उत्साह उसळणे
आजी आपल्या घरी राहायला येणार आहे, ही बातमी ऐकताच मुलांच्या उत्साहाला उधाण आले.
24 देणे - घेणे नसणे -- संबंध नसणे
अजय फारच प्रामाणिक मुलगा आहे, चोरीच्या घटनेशी त्याचे काहीही देणे-घेणे नाही.
25 पाठलाग करणे - पिच्छा करणे
पोलिसांनी दरोडेखोरांचा पाठलाग करून त्यांना पकडले.
26 पारंगत असणे - कुशल असणे
माझी मैत्रीण चित्र काढण्यात पारंगत आहे.
27 भान नसणे - गुंग होणे, दंग होणे
मी गाणे ऐकण्यात एवढी तल्लीन झाली होती की आई कधी आली याचे मला भानच नव्हते.
28 मोलाची भर घालणे - मूल्यवान कार्य करणे
प्रत्येक माणसाने यथाशक्ती मदत करून देशकार्यात मोलाची भर घातली पाहिजे.
29 हात राबणे - कष्टाची कामे करणे
आपल्याला अन्न धान्य देण्यासाठी मातीमध्ये शेतकऱ्यांचे हात राबतात.
30 पुष्टी देणे - पाठिंबा देणे
सैनिकांना आणि शेतकऱ्यांना जर आपण पुष्टी दिली तरच आपल्या देशाचे कल्याण होईल.
31 कष्टी होणे - दुःखी होणे
नोकरी गेल्यामुळे रामदास खूपच कष्टी झाला होता.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें