1 - 'अलगद उतरतात दवांचे टपोरे थेंब' या ओळीचा भावार्थ लिहा.
उत्तर - ( प्रस्तावना )
झाड हे निसर्गाचे एक सुंदर घटक आहे. झाड आपल्या गुणांमुळे कवीला आकर्षित करून घेते. झाडाचे निरामय हिरवे सौंदर्य कवीच्या मनावर भूल घालते. पहाटेच्या वेळी जेव्हा कवी झाडाजवळ जातो तेव्हा झाडाच्या पानांवर पडलेले दवांचे टपोरे थेंब कवीच्या वहीच्या पानांवर अलगदपणे टपटप पडत असतात.
या ओळीतून कवीला असे सुचवायचे आहे की पहाटेची शांत वेळ, हिरवेगार झाडाचे सौंदर्य, दवबिंदू, हे सर्व कवीला स्फूर्ती देतात व त्याच्या वहीवर दवबिंदूसारखे कवितांचे शब्द हळूवार, नाजूकपणे उतरतात. झाडाला पाहून कवीला कविता सुचते.
2 - 'झाडापासून आनंदी जीवन शिकावे' या विधानातील विचार स्पष्ट करा.
उत्तर : no need of prastavana
'जो वृक्षाची लागवड करतो व जो वृक्ष तोडतो, या दोघांमध्ये वृक्ष कधीच भेदभाव करीत नाही, तो दोघांना सारखीच सावली देतो' असे संत ज्ञानेश्वर महाराजांनी एका ओवीत सांगितले आहे. झाडामध्ये दानशूरता व परोपकार हे गुण आहेत. झाडाची पाने, फुले, फळे, लाकडे हे सर्व दुसऱ्यांसाठीच असतात. स्वतः उन्हात उभे राहून झाड पशूपक्षी व माणसाला सावली देते. ऊन, पाऊस, कडाक्याच्या थंडीत झाड अविचल राहते. पानगळीचा मोसम संपला की ते पुन्हा नवीन पानांनी नव्या नवरी सारखे सजते.
या ओळीतून स्पष्ट होते की माणसाने प्रत्येक परिस्थितीत झाडासारखे आनंदी जीवन जगावे, झाडाचे चांगले गुण आपल्या अंगी बाळगावे. खडतर परिस्थितीत न डगमगता ठामपणे उभे राहावे. जीवनातील हिरवाई म्हणजे आनंद व उत्साह जपून ठेवावे.
कोई टिप्पणी नहीं:
एक टिप्पणी भेजें